ताज्या घडामोडी

विणकरांचा विमा योजनेच्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*

*विणकरांचा विमा योजनेच्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*
येवला-भाजपा महाराष्ट्र प्रदेश
विणकर प्रकोष्ठ व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग आयोजित विणकर विमा शिबिराला गुरूवार दिनांक 14/09/2023 रोजी येथील श्री चौंडेश्वरी मंदिरात भाजपा नाशिक जिल्ह्य्याचे अध्यक्ष सन्माननीय शंकरराव वाघ यांच्या शुभहस्ते व विणकर प्रकोष्ठ चे प्रदेश अध्यक्ष मनोज दिवटे,महाराष्ट्र शासन वस्त्रोद्योग विभागाचे वरिष्ठलिपीक आर.कोलते साहेब,दिनेश कासार साहेब यांच्या उपस्थितीत सुभारंभ करण्यात आला. दोन दिवस सुरू असलेल्या या शिबिरात चारशे पंचावन्न विणकर बंधू व भगिनींनी सहभाग घेऊन केंद्र व राज्य शासनाकडून विमा कवच मिळविले.प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना(PMJJY),प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना(PMSBY) तसेच भारतीय डाक विभागामार्फत दहा लाख रूपयांचे अपघाती कवच असलेली विमा योजनांकरीता विणकरांचे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते.यावेळी शहराध्यक्ष तरंग पटेल,बापूसाहेब गाडेकर,युवाचे मयूर मेघराज,संतोषभाऊ केंद्रे,विणकर प्रकोष्ठ चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागपुरे,पंकज पहिलवान,जितेंद्र पहिलवान,अनिल हबीब,देवांग कोष्टी समाज अध्यक्ष मनोज भागवत,शिरीष पेटकर,दिपक टकले,गणेश वायडे,रविन्द्र शिंदे,गणेश फासे,नारायण देखणे,आशिष भोजने,आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!