ताज्या घडामोडी

अप्पर पोलीस अधीक्षक ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांची भारताकडून कॅनडासाठी निवड

अप्पर पोलीस अधीक्षक ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांची भारताकडून कॅनडासाठी निवड

: सहसंपादक, संस्थापक:डॉ. भारत देवळेकर सरकार –

मुंबई : महराष्ट्रात केसरी कुस्ती स्पर्धेत सलग तीन वेळा विजेतेपद पटकविणारे अप्पर पोलीस अधीक्षक पै. विजय चौधरी हे आगामी वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स स्पर्धेत कुस्ती खेळासाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ही स्पर्धा २८ जुलै ते ०६ ऑगस्ट या कालावधीत कॅनडा येथील विनिपेग या शहरात होणार आहेत. चौधरी यांनी २०१४,२०१५ आणि २०१६ अशा सलग तीन वर्षामध्ये अतिशय प्रतिष्ठित अशा ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते. मूळचे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील सायगाव बगळीचे रहिवासी असलेले चौधरी हे सध्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखा पुणे विभागात येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आगामी पोलीस खेळांमध्ये ते १२५ किलो वजन गटात खेळणार असून, हिंद केसरी पै .रोहित पटेल यांच्याकडून ते कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहेत. आता कॅनडामध्ये तिरंगा फडकावण्याचे ध्येय उराशी बाळगून चौधरी हे कॅनडाला रवाना होतील.

पोलिस टाईम्स न्यूज 24 शी बोलताना विजय चौधरी म्हणाले, “ आगामी स्पर्धेत कॅनडा, रशिया, अमेरिका, चीन या देशांच्या कुस्तीपटूंचे भारताला मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे खेळात चांगली कामगिरी करण्यासाठी मी प्रशिक्षणावर अधिक भर देत आहे. या प्रशिक्षणासाठी मला महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात कॅनाडियन टाईम झोन नुसार माझे सध्याच्या घडीला प्रशिक्षण सुरु आहे.”
गेल्या वर्षी २०२२ साली पुण्याच्या वानवडी येथील एस आर पी एफ ग्राऊंड मध्ये झालेल्या ऑल इंडिया पोलिस गेम्स स्पर्धेत चौधरी यांनी महाराष्ट्र पोलिस दलाचे प्रतिनिधित्व करत असताना सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नावलौकिक केले खुहोते. आता येणारी स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय पातळीवर असून जागतिक पोलिसांसाठी ऑलिंपिक च्या दर्जाची मानली जाते. आजवर केलेल्या कामगिरीपेक्षाही अधिक चांगली कामगिरी या स्पर्धेत करण्याचा मानस चौधरी यांनी व्यक्त केला आहे. भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी विजय नथू चौधरी यांनी त्यांचे सर्वस्व पणाला लावले आहे.
व याकरता त्यांनी अनेक छोट्या-मोठ्यांचे, स्वतः प्रत्यक्ष त्यांना कॉल करून त्यांचे आशीर्वाद ही घेतले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!