ताज्या घडामोडी

अमळनेर मधील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील सराईत चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

अमळनेर मधील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील सराईत चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी शाहिद खान.

जळगाव: अमळनेर येथील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. भूषण उर्फ जिगर रमेश भंडारे, (वय-२६) रा. उमाळा ता. जि जळगाव, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अमळनेर पोलीस स्टेशनला दाखल गु.र.न. ३७९/२२ भा.द.वी कलम नुसार २५ जुलै रोजी दाखल मोटर सायकल चोरीच्या गुन्हा उघडकीस आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यापासून या गुन्ह्यातील निष्पन्न झालेल्या आरोपी भुषन बोंडारे हा फरार होता. अमळनेर पोलिसांचे पथक त्याचा भागावर होते.
दरम्यान भूषण बोंड आरे हा जळगाव शहरात असल्याची गोपनीय माहिती पो.नि. जयपाल हिरे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहाकारी पोलीस उ.प निरीक्षक आनंद सिंग पाटील, पो.हे.कॉ गणेश शिरसाळे, पो.ना किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी, पो.कॉ छगन तायडे, किरण पाटील, आदींनी त्याच्या मागावर रवाना केले होते. या पथकाने त्याला शिताफीने अटक केली असून अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अटकेतील भुषन बोंडारे याच्या विरुद्ध चोरी, जबरी घरफोडी, तसेच आर्म अॅक्ट चे एकूण ३६ गुन्हे दाखल आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!