ताज्या घडामोडी

स्वामी मुक्तानंद शैक्षणिक संकुल स्वामी मुक्तानंद विद्यालय (इंग्रजी माध्यम) सांस्कृतीक व बक्षीस वितरण सभारंभ

सचीन वखारे! येवला

स्वामी मुक्तानंद शैक्षणिक संकुल

स्वामी मुक्तानंद विद्यालय (इंग्रजी माध्यम)

सांस्कृतीक व बक्षीस वितरण सभारंभ (२०२२-२३)

धवल यशाची परंपरा असलेल्या स्वामी मुक्तानंद शैक्षणिक संकुलाचे स्वामी मुक्तानंद विद्यालय (इंग्रजी) माध्यमांच्या सांस्कृतीक व बक्षीस वितरणाचा सभारंभ येवला येथील महात्मा फुले नाटयगृहात मोठ्या आनंदात व उत्साहात पार पडला. संस्थेचे अध्यक्ष डॉ श्री अमृतसा सारंगधरसा पहिलवान यांनी अध्यक्षीय भाषणात इंग्रजी माध्यमाच्या नवीन इमारतीची पाया भरणी येत्या रविवारी १९ फ्रेबुवारी रोजी होणार असल्याची सांगून आश्चर्याचा धक्का दिला. संस्थेचे सेक्रेटरी श्री संजय नागडेकर यांनीही विद्यार्थ्याचे व शिक्षकांचे देखील विशेष कौतूक केले तसेच संस्थेचे खजिनदार व इंग्रजी माध्यमाचे प्रमुख श्री सुधाशुं खानापुरे यांनी कार्यक्रमाचे खुप कौतूक व “अंतरंग” म्हणजे विद्यार्थ्याचे कलागुणाचा विकासाचे माध्यम आहे व ते जोपासले पाहिजेत असे नमुद केले व अशीच उल्लेखनीय व धवल यशाची परंपरा यामध्ये सातत्य ठेवण्याचे सुचविले

विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री युवराज काशिद यानी शाळेच्या विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय विकासाचा आराखड मांडला व त्यामध्ये ऑलंपियाड परिक्षेत मिळविलेले विद्यार्थ्याचे यश व सायन्स एक्सिबिशेन्स मधील यश तसेच किराटे स्पर्धेत- राष्ट्रीय स्तरावर मिळालेले यश आणि बुद्धीबळ व कुस्तीस्पर्धेत तालुकास्तरावर मिळालेले यश हे देखील नमुद केले.

जूनियर के जी ते १० वीच्या विदयार्थ्याने अतीशय सुंदर नृत्य सादर करून सर्वांची दाद मिळविली तसेच दोन उत्कृष्ट असे नाटक देखील सादर केलीत. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ अमृतसा पहिलवान, सेक्रेटरी – संजयजी नागडेकर, खजिनदार सुधांशुजी खानापुरे, श्री दिपकभाऊ गायकवाड, डॉ किशोर पहिलवान, श्री दत्तात्रय नागडेकर, डॉ किरण पहिलवान, श्रीमती शंकुतलाताई पहिलवान, सौ संगिता खानापुरे, श्री. तेजस गायकवाड श्री अमोल एंडाईत, डॉ गोस्वामी सर, श्री विभुते सर, श्री ढोले सर, श्री भागवत सर, श्री कदम सर, श्री सुमीत गायकवाड सर, श्री हारके सर, श्री पाडवी सर, श्री हेमंत गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्याना प्रशस्तीपत्रक देवून सत्कार करण्यात आला.

शाळेचे पर्यवेक्षक श्री विजय भावसार यांनी पालक-शिक्षक सभासदाचा सत्काराचे व बक्षीस वितरणाचे वाचन केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक कमिटीच्या अध्यक्षा सौ सुनीता पाटील यांनी यांनी केले. सौ. राणी धिवर यांनी विद्यार्थ्याची सुत्रसंचालनाची तयार करून घेतली व श्री श्रीकांत वाकचौरे, श्री वाल्मीक पवार, श्री सौरव कुक्कर, श्री सुमित गायकवाड यांनी विद्याथ्यांची व पालकांची आसन व्यवस्थेचे काम चोख पार पाडले व श्री सोमनाथ भावसार सर, सौ शेटे, निकिता गायकवाड, श्रीमती घोलप, सौ. गायकवाड, सौ गवळी, सौ जमदाडे , सौ विसपुते, सौ मोरे, श्रुती मोरे, सौ भिंगारकर यांनी सजावटीचे काम चोखपणे पार पाडले. सौ पल्लवी ढोमसे यांनी आभार प्रदर्शन केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला.
साठी सचिन वखारे ,येवला

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!