ताज्या घडामोडी

स्व.लता दीदी यांच्या प्रथम स्मृती स्वर मंगेशानी आदराजली

स्व.लता दीदी यांच्या प्रथम स्मृती स्वर मंगेशानी आदराजली
नाशिक – मोगरा फुलला… स्वर गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला या गीताने सुरुवात होऊन एकापेक्षा एक सरस गीताना रसिक श्रोत्यांची उत्स्फूर्तपणे साथ मिळाल्याने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला . कलांगण चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांचे वतीने भारतरत्न लता दीदी यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्त स्वर मंगेशाचे या सांगितीक कायरेक्रम महाकवी कालिदास कला मंदिर येथे मंगेशकर पाचही भावंडांवर आधारित सादर केला. याची निर्मिती संकल्पना गायिका चैत्राली अभ्यंकर यांची आहें.यात त्यांच्या सोबत मुंबईचे गायक ऍड.अमित दाते आणि नाशिक मधील गायक संदीप थाटसिंगार गायन, साथ केली. वादयवृंद संयोजन रागेश्री धुमाळ, अनिल धुमाळ,आदित्य कुलकर्णी,अभिजीत शर्मा,महेश कुलकर्णी आदिनी साथ संगत केली. संहिता लेखन प्रवीण जोशी यांनी केले. अभिवाचन अक्षय वाटवे यानी केले. वादळ वार सुटलं ग,सांग सांग भोलानाथ ,वेडात दौडले वीर मराठे साथ, ने मजसी ने मातृभूमीलाआधी गीतांना रसिकांना भरभरून दात दिली .या कार्यक्रमास रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान स्वरानी दीदींना आदरांजली वहान्यात आली. समारोप रेशमाच्या रेघांनी लाल काळया धाग्यांनी व मराठी पाऊल पडते या गीतांनी झाला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!