ताज्या घडामोडी

शेतजमीन विक्री करण्यास नकार दिल्यामुळे त्या कारणावरुन झालेल्या भांडणावरुन आरोपीस दोनवर्ष सक्त मजुरीची शिक्षा व रु.१६,०००/- आर्थीक दंड.

शेतजमीन विक्री करण्यास नकार दिल्यामुळे त्या कारणावरुन झालेल्या भांडणावरुन आरोपीस दोनवर्ष सक्त मजुरीची शिक्षा व रु.१६,०००/- आर्थीक दंड.

हकीकत- येवले तालुक्यातील मुरमी येथील शेतजमीन विक्री करण्यास नकार दिल्यामुळे त्या कारणावरुन झालेल्या भांडणावरुन झालेल्या शिवीगाळ व मारहाण घटणेतील चार आरोपीस येवला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो. श्री. एम. एस. लिंगाडे यांनी दोनवर्ष सक्त मजुरीची शिक्षा व आर्थीक दंडाची • शिक्षा प्रत्येक आरोपीस विविध कलमाखाली प्रत्येकी रु.४,०००/- ठोठावली आहे.

या खटल्यातील फिर्यादी नामे बाळासाहेब सखाराम शिंदे यांस दिनांक १४/३/२०१३ रोजी सर्व आरोपींनी संगनमत करुन मुरमी येथील ग.नं. १२८ ही जमीन आम्हांला विक्री कर या कारणावरुन फावडे व काठीने मारहाण केली त्याअनुशंगाने येवला तालुका पोलिस स्टेशनला भा.द.वि. कलम ३४१, ३२४, ३२३, ५०४, ५०६ सह ३४ कलमान्वये गुन्हा दाखल होवुन सदर गुन्हयाचा तपास विजय काशिनाथ जाधव-पोलिस हवालदार यांनी करुन मा.न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले.

मा. न्यायालयात सरकार पक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता सो. आनंद स. वैष्णव यांनी कामकाज पाहिले व एकंदरीत सात साक्षीदार तपासुन प्रखर युक्तिवाद केला व त्यानंतर येवला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो. श्री. एम. एस. लिगाडे यांनी दि.१/३/२०२३ रोजी सदर प्रकरणांत न्यायनिर्णय देवुन आरोपी नामे अप्पासाहेब प्रभाकर शिंदे, बाबासाहेब प्रभाकर शिंदे, शंकर प्रभाकर शिंदे व विष्णु प्रभाकर शिंदे सर्व रा.मुरमी ता. येवला जि.नाशिक यांना विविध कलमाखाली खालील प्रमाणे शिक्षा व आर्थीक दंड ठोठवण्यांत आला आहे.

(१) भा.द.वि. कलम ३२४ प्रमाणे २ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व प्रत्येकी एक हजार रु. दंड, दंड न भरल्यास १५ दिवसाची साधी शिक्षा..

२) भा.द.वि. कलम ३२३ प्रमाणे ६ महिने सक्त मजुरीची शिक्षा व प्रत्येकी रु. ५००/- दंड, दंड न भरल्यास १५ दिवसाची साधी शिक्षा.

३) भा.द.वि. कलम ३४१ प्रमाणे १५ दिवस साधे कैदेची शिक्षा व प्रत्येकी रु.५००/- दंड, दंड न भरल्यास १५ दिवसाची साधी शिक्षा.

४) भा.द.वि. कलम ५०४ प्रमाणे १ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व प्रत्येकी रु.१,०००/- दंड, दंड न भरल्यास १५ दिवसाची साधी शिक्षा.

५) भा.द.वि. कलम ५०६ प्रमाणे २ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व प्रत्येकी रु.१,०००/- दंड, दंड न भरल्यास १५ दिवसाची साधी शिक्षा.

सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगावयाच्या आहेत. सदर दंडाची रक्कम एकंदरीत १६,०००/- रु. फिर्यादी यांस नुकसान भरपाई म्हणुन आदेशित केलेले आहे.

सदर प्रकरणांत पैरवी अधिकारी प्रविण वनवे व चंद्रकांत इनामदार तसेच लिपीक संदीप मेढे यांनी सहकार्य केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!