ताज्या घडामोडी

सुप्रीम कॉलनीत पैसे देण्यास नकार दिल्याने एकाला मारहाण;एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सुप्रीम कॉलनीत पैसे देण्यास नकार दिल्याने एकाला मारहाण;एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी दिनांक 22 रोजी रामदेव बाबा मंदीराच्या जवळ, सुप्रीम कॉलनी, जळगाव येथे गोपाळ राजराम सपकाळे, (वय 58) धंदा मजुरी, रा. सुप्रीम कॉलनी, श्रीकृष्ण नगर, जळगाव हे प्रात:विधी करुन परत येत असतांना यातील सोनुसिंग रमेश राठोड याने गोपाळ राजाराम ला सांगितले मला पैसे दे,नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. असता गोपाळ यांनी माझ्या कडे पैसे नाही असे सांगुन पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी मजकुर यास त्याचा राग आल्याने आरोपीताने त्याचे जवळील लाकडी दांडुक्याने गोपाळ यांना मारहाण केली होती. सदर मारहाणीत गोपाळ यांचे दोन्ही हाताचे दंडाचे फ्रेंक्चर करुन जबर दुखापत केली म्हणुन आरोपी सोनुसिंग रमेश राठोड याचे विरुध्द एम. आय. डी. सी. पो.स्टे. ला भादवि कलम 326 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी सोनुसिंग रमेश राठोड हा सदरचा गुन्हा घडल्यापासुन सुमारे 02 झाले फरार होता. सदरचा आरोपी हा एम.आय.डी.सी. पो.स्टे. च्या अभिलेखावरील हद्दपार आरोपी आहे. सदर आरोपीताचा शोध घेणे मा. पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे सो. यांनी स.फौ. अतुल वंजारी, पो.हे.कॉ. महेद्रसिंग पाटील, पो.ना. सुधीर सावळे, सचिन पाटील, पो.कॉ. विशाल कोळी, मुकेश पाटील, सतिष गर्जे यांचे पथक स्थापन केले होते. सदर आरोपी हा सुप्रीम कॉलनी येथे आला असल्याची गुप्त बातमी मा. पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे सो. यांना मिळाल्यावरुन वरील पथकाने आरोपी नामे सोनुसिंग रमेश राठोड, (वय 23) वर्ष, रा. रामदेवबाबा नगर, सुप्रीम कॉलनी, जळगाव यास सुप्रीम कॉलनी येथुन अटक केली आहे. व त्याचे ताब्यातुन त्याने गुन्हयात वापरलेला लाकडी दांडा हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.हे.कॉ. महेंद्रसिंग पाटील, पो.ना. सचिन पाटील करीत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!