ताज्या घडामोडी

पंचवटी एक्सप्रेस मध्ये पास धारकांची दादागिरी* *रेल्वे प्रशसनाने खुलासा करावा*

*पंचवटी एक्सप्रेस मध्ये पास धारकांची दादागिरी*

*रेल्वे प्रशसनाने खुलासा करावा*

*प्रतिनिधी एजाज देशमुख*

दररोज सकाळी साधारण ६ वाजता सुटणाऱ्या पंचवटी एक्सप्रेस ने जिल्यातील हजारो प्रवासी मुंबई नाशिक या ठिकाणी ये जा करतात .सकाळी मुंबईला जाऊन रात्री परत आपापल्या घरी यायच्या दृष्टीने पंचवटी एक्सप्रेस नासिक जिल्याला वरदान ठरली आहे.
ह्या गाडी मध्ये नोकरी साठी रोज जाणाऱ्या प्रवशांना रेल्वे ने पास ची सुविधा देऊन मनमाड व नासिक चाकर्मण्या साठी प्रत्येकी एक (बोगी) आरक्षित ठेवली आहे.मात्र अलीकडे ह्या पास धारकांची दादागिरी व मुजोरपणा जास्तच वाढला असुन याचा त्रास मात्र सामान्य प्रवाशांना भोगावा लागत आहे.इतर प्रवासी ह्या बोगीं त गेल्यास त्यांना सीट खाली असताना देखील पास धारक बसण्यास मनाई करतात .इतकेच नव्हे तर लहान मुले व लेडीज यांना देखील सीट वर जागा असताना बसण्यास मज्जाव करतात . अक्षरशः ३प्रवाशांची जागा असलेल्या बाकावर दोन पासाधरक बसतात ,परंतु इतर प्रवाशांना ताटकळत उभे ठेवतात .या संदर्भात रेल्वे प्रशासनकडून खुलासा होऊन कारवाईची अपेक्षा इतर प्रवाशांकडून होत आहे .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!