ताज्या घडामोडी

दुर्लक्ष करायला शिका

*दुर्लक्ष करायला शिका*
लोहाराच्या बंद दुकानात फिरता फिरता एक साप घुसला…
तेथे सापाच्या रुचीची कोणतीही गोष्ट नव्हती, तिथे पडलेल्या एका करवती मुळे त्याला खूप किरकोळ जखम झाली,घाबरून सापाने मागे वळून पूर्ण ताकदीने करवतला चावलं, सापाच्या तोंडातून रक्त वाहू लागले…
पुढे *सापाने आपल्या स्वभावाप्रमाणे करवतीला स्वतःला गुंडाळून, बांधून आणि गुदमरून मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला,* दुसऱ्या दिवशी जेव्हा लोहाराने दुकान उघडले तेव्हा त्याला करवतभोवती गुंडाळलेला मेलेला साप दिसला, जो इतर कोणत्याही कारणास्तव नाही स्वतः च्या रागाचा आणि अहंकारचा बळी पडला होता…..

कधी कधी अहंकार व रागाच्या भरात आपण इतरांना इजा करण्याचा प्रयत्न करतो,पण कालांतराने आपल्याला कळते की आपण स्वतःचेच जास्त नुकसान केले आहे.

*कधीकधी आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी*

काही गोष्टिंना
काही लोकांना
काही अपघातांना
कोणाच्या बोलण्याला

दुर्लक्ष केले पाहिजे…
*स्वतःला लक्षपूर्वक दुर्लक्ष करण्याची सवय लावा,* आवश्यक नाही की प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया दाखवावेच. कधीकधी आपल्या काही प्रतिक्रिया केवळ आपल्याला हानीच नाहीत तर आपला जीव देखील घेऊ शकतात.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!