ताज्या घडामोडी

मणिपूर मधील महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीच्या शिक्षेची मागणी – सौ. मंगलाताई पाटील

मणिपूर मधील महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना

फाशीच्या शिक्षेची मागणी – सौ. मंगलाताई पाटील

बुलडाणा- दिनांक २१ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मणिपूर मधील महिलांवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. मणिपूर राज्यात गेल्या ८० दिवसापासून जातिवादातून प्रचंड दंगल उसळली असून शेकडो लोकांचे प्राण त्यात गेले आहे. ६० ते ६५ हजार कुटुंब बेघर झाले असुन याकडे लक्ष देण्यास केंद्रशासन व मणिपूर राज्यशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेश दौऱ्यात व निवडणुकीत मग्न आहे. त्यांना किंवा त्यांच्या शासनातील मंत्र्यांना अत्याचारित कुटुंबास भेट किंवा विचारपूसही करण्यास वेळ नाही. असंवेदनाशील हे सरकार आहे व तीच परिस्थिती तेथील राज्य शासनाची आहे. कुटुंबे उध्वस्त झाली असून महिलांवर अत्याचार होत आहे. दोन महिन्यापूर्वी दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यासोबत आत्याचार करण्यात आला. पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिल्यावरही त्या गुंडांवर ह्या शासनाने

काहीच कार्यवाही केली नाही. ही बाब जेव्हा देशासमोर आली तेव्हा माननीय + सरन्यायाधीशांनी तंबी दिल्या नंतर या दोन्ही शासनाला जाग आली आहे. देशातील स्त्रियांची विटंबना होत आहे, पशु पेक्षाही हीन दर्जाची वागणूक त्यांना मिळत आहे. मणिपूरची ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून अमाणूसपणाचा कळस झाला आहे. अश्या क्रूर नराधमांना त्वरित अटक करून त्यांना पासीची शिक्षा द्यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे जिल्हा महिला कॉंग्रेस कडून करण्यात आली आहे. सदरचे निवेदन मा. जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून याप्रसंगी सौ. जयश्रीताई शेळके सचिव महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सौ. मीनलताई आंबेकर उपाध्यक्ष, प्रदेश महिला काँग्रेस कमिटी, सौ नंदिनीताई टारपे सरचिटणीस प्रदेश महिला काँग्रेस कमिटी, माननीय विजय अंभोरे उपाध्यक्ष प्रदेश कॉंग्रेस कमिटी, माननीय श्री. लक्ष्मणराव घुमरे माजी जिल्हाध्यक्ष,

माननीय बाळासाहेब भोंडे ज्येष्ठ नेते, माननीय प्राध्यापक श्री. संतोष राव आंबेकर, श्री. शैलेश खेडेकर जिल्हा अध्यक्ष एन एस यु आय. माननीय श्री. दत्ता काकस शहराध्यक्ष, माननीय अॅड. श्री. प्रवीण सुरडकर, बुलडाणा जिल्हा महिला कॉंग्रेस अध्यक्ष सौ. मंगलाताई पाटील, मा. सिमा मेहंगे, नवनीता चव्हाण, सुनंदा पवार, पंचफुला पाटील, पूजा मिरकुटे, प्रीती भगत, कल्पना पाटील, जोत्स्ना जाधव, बानोडी चौधरी, पी डी महाले, आशा इंगळे, उषा लहाने, कमल गवई, शैलेश खेडकर, उषा नरवाडे, रेखा भंडारे, माधुरी शिराळ, संध्या मापारी, कोमल नंदकिशोर जुनारे, सौ. स्नेहा नीरज पांडे, तृप्ती सोनवणे, जयमाला तायडे, मनीषा सतीश ठाकूर इत्यादी मान्यवर तसेच पदाधिकारी उपस्थित होते. या सवीच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोदी शासनाच्या विरुद्ध व मणिपूर राज्यशासनाच्या विरुद्ध निषेध करून घोषणा देण्यात आल्या. यावेळी मोठ्‌याप्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!