ताज्या घडामोडी

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयांच्या विकासासाठी प्रयत्न करणार -केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*

 

*पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयांच्या विकासासाठी प्रयत्न करणार -केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

*भारती धिंगान (प्रतिनिधी)* *नाशिक.*
मुंबई दि. 29 –  महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे काम कोणतेही मतभेद न बाळगता एकजुटीने करावे.पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयांच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील आहोत. राज्य सरकारकडून बेलापूर सेन्ट्रल विद्यालयाच्या पुनर्विकासासाठी 4कोटी 50 लाख आणि  नवीन विद्यालय इमारतीसाठी 14 कोटी मंजूर झाले असून त्याचे काम लवकर सुरू होईल.बेलापूर मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी सिडको कडून 5 एकर जमीन मिळवून भव्य शिक्षण संकुल उभारून मागासवर्गीय विद्यर्थ्यांसाठी मेडिकल कॉलेज ; बिझिनेस मॅनेजमेंट सारख्या विद्याशाखांचे शिक्षण  उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अधिकृत चेयरमन आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.

बेलापूर येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सेन्ट्रल स्कुल च्या 42 व्या वार्षिक संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून ना.रामदास आठवले बोलत होते.यावेळी विचारमंचावर पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष पद्मश्री  डॉ.सुखदेव थोरात; जी एस टी आयुक्त रवींद्र बांगर; उषाताई गांगुर्डे;  ऍड.बी के बर्वे; प्रिन्सिपल बी बी पवार; यु एम मस्के;सिद्राम ओव्हाळ; भानुदास पाटील; सरोज पाटील; रिपाइं जिल्हा अध्यक्ष महेश खरे;विजय राजे ढमाल; मंगल ढवळे; चंद्रशेखर कांबळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

पीपल्स एज्युकेशन सोसायटी च्या विद्यालयांमध्ये सर्व जाती धर्माचे विद्यार्थी शिकत आहेत. बेलापूर सेन्ट्रल इंग्लिश स्कुल मध्ये दलित आदिवासी विद्यर्थ्यांच संख्या कमी आहे. त्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत देऊन गरीब विद्यर्थ्यांना मदत करून या शाळेत दलित आदिवासी आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांची संख्या वाढवा. सध्या शाळेची पटसंख्या चांगली असल्याबद्दल प्रिन्सिपल बी बी पवार यांचे  ना.रामदास आठवले यांनी कौतुक केले. यावेळी वार्षिक संमेलनात उत्कृष्ट विद्यर्थ्यांचा  आणि शिक्षकांचा ना.रामदास आठवले यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी खुप गर्दी केली होती.
प्रसिद्धीप्रमुख हेमंत रणपिसे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!