ताज्या घडामोडी

ब्लेडने वार करणाऱ्या फरार आरोपी ;एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

ब्लेडने वार करणाऱ्या फरार आरोपी ;एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील तांबापुरात दारू पिण्यासाठी पैसे ना दिल्याच्या रागातून तरुणावर ब्लेटने वार करून फरार झालेल्या संशयत आरोपी एमआयडीसी पोलिसांनी तांबापुरात परिसरातून १८ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता अटक केली आहे. संशयितावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून न्यायालयात पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अरबाज राऊत खाटीक, (वय-२४) रा. जुम्मा शाह वखारजवळ तांबापुरा जळगाव येथे आपल्या परिवारासह राहिला आहे. भंगार खरेदी विक्रीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. २३ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास समीर हमीद काकर रा. तांबापुरा, जळगाव याने अरबाज कडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. अरबाज खाटीक यांनी दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून समीरने हातातील ब्लेडने वार करून कानाला गंभीर दुखापत केली होती. करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी समीर अमित काका, हा फरार झाला होता. ३ महिन्यानंतर संशयित आरोपी समीर हमीद काकर, हा तांबापुरा परिसरात आल्याची गोपनी माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.हे.कॉ नितीन पाटील, सैय्यद इमरान, सुधीर साळवे, सचिन पाटील, यांनी रविवारी १८ डिसेंबर रोजी रात्री कारवाई करत संकेत आरोपी समीर काकर याला अटक केली. त्याला जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती जे एस कोरकर यांच्या न्यायालयत हजर केले असता. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे ऍड. स्वाती निकम यांनी काम पाहिले. दरम्यान अटक केलेल्या संसद आरोपीविरोधात हाणामारी, दरोडा, दंगल, या सारखे पोलीस ठाण्यात ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!