ताज्या घडामोडी

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदासंघात निफाड तालुक्यातील १६ गावांमध्ये होणार तलाठी कार्यालय-निवासस्थाने*

*मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदासंघात निफाड तालुक्यातील १६ गावांमध्ये होणार तलाठी कार्यालय-निवासस्थाने*

*मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघात निफाड तालुक्यातील १६ तलाठी, कार्यालय व निवासस्थानासाठी ४ कोटी ८० लक्षचा निधी*

*निफाड तालुक्यातील १६ तलाठी कार्यालय व निवासस्थानासाठी ४ कोटी ८० लक्षचा निधी*

*नाशिक,येवला,लासलगाव,दि.१३ जुलै :-* राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला मतदासंघांत निफाड तालुक्यातील १६ गावांमध्ये नवीन तलाठी कार्यालय व निवासस्थानासाठी ४ कोटी ८० लक्ष रुपयांच्या निधीस शासनाची मंजुरी मिळाली आहे. या विकास कामांमुळे सुसज्ज कार्यालय उभे राहणार असून नागरिकांना महसुली सुविधा उपलब्ध होण्यास अधिक मदत होणार आहे.

येवला मतदासंघांत निफाड तालुक्यातील १६ गावांमध्ये नवीन तलाठी कार्यालय व निवासस्थाने बांधण्यासाठी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार या नूतन तलाठी, मंडल कार्यालय व निवासस्थाने बांधण्यासाठी शासनाकडून ४ कोटी ८० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामांमुळे सुसज्ज कार्यालय उभे राहणार असून नागरिकांना महसुली सुविधा उपलब्ध होण्यास अधिक मदत होणार आहे.

यामध्ये निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव,विंचूर, विष्णूनगर, गोंदेगाव, धारणगाव वीर, डोंगरगाव, लासलगाव, टाकली, विंचूर, निमगाव वाकडा, पिंपळगाव नजिक, वनसगाव, देवगाव, वाकद, कानळद, खेडलेझुंगे, भरवस या एकूण सोळा गावांचा समावेश असून या गावांमध्ये तलाठी कार्यालय व निवासस्थाने बांधण्यात येणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!