ताज्या घडामोडी

कोयत्याने हल्ला करणाऱ्या आरोपी ; बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

प्रतीनिधी शाहीद खान :-

भुसावळात कोयत्याने हल्ला करणाऱ्या आरोपी ; बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ शहरातील पंचशील नगरातील एका महिलेची प्रेम संबंध असल्याच्या संशयातून महिलेच्या तरुण मुलाने भाजीपाला विक्रेत्यार्थीच्या आईवर नारळ सोलण्याच्या कोयत्याने प्रणघातक हल्ला केला होता. ही घटना मंगळवार २० जुन रोजी शहरातील आठवडे बाजारात घडली होती. बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाने संशयित आरोपी राहुल राजपूत ( रा. पंचशील नगर भुसावळ,) यास अटक केल्यानंतर संशयित आला गुरुवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सोनावली.

अधिक माहिती अशी की, जीवन लक्ष्मण चौधरी (वय-३०) या तरुणाचे एका महिलेची संबंध असल्याच्या संशय महिलांच्या मुलगा राहुल राजपूतला झाल्यानंतर त्याने मंगळवारी रात्री १० वाजता आठवडे बाजार भागात तरुणावर कोयते आणि हल्ला चढवला व नंतर तरुणाची आई बेबाबाई लक्ष्मण चौधरी (वय-५२) रा. आठवडे बाजार मच्छी मार्केट भुसावळ, यांना देखील कोणत्या मारून जखमी केले. हल्ल्यानंतर संचित पसार झाल्याने त्याच्यावर सुरू असताना संशयित आरोपी घोडेपीर बाबा दर्गा भागात असल्याची माहिती यंत्रणाला मिळाल्यानंतर त्यास बुधवारी अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कृष्णा पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हरीश भोये, हवलदार रमण सुरळकर, नाईक उमाकांत पाटील, निलेश चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, प्रशांत सोनार, जावेद शाह, दिनेश कापडणे, आदींनीच्या पथकाने केली. संशयित राहुल राजपूत याला चार दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली असून या गुन्ह्यात अन्य एक संशयित पसार असून त्याच्या शोध सुरू आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!