ताज्या घडामोडी

मलकापूर नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा.

मलकापूर नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा.

प्रतिनिधी : प्रकाश कांबळे.

*मलकापूर (ता.शाहूवाडी) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या शाहूवाडी तालुक्यातील वैभवशाली मलकापूर नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती, यांच्या शुभहस्ते पार पडले.
शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज मुर्ती कमिटीच्या वतीने काल २० फेब्रुवारी रोजी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले.शाहूवाडी तालुक्यात पहिल्यांदाच बॉझ धातूपासून बनविण्यात आलेला सुमारे ८०० किलो वजनांचा हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असल्याचे सांगितले.
यावेळी मलकापूर मुख्याधिकारी तथा प्रशासक, खासदार,आमदार,जिल्हा परिषद सदस्य तसेच सर्व आजी माजी नगरसेवक,मलकापूर नगरीतील, शाहूवाडी तालुक्यातील सर्व तरुण मंडळे व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!