ताज्या घडामोडी

एमआयडीसी पोलीस ठाण्यात जवळ बंद कंपनीच्या आवारात वृद्धाचा जळालेल्या मृतदेह प्रतिनिधी शाहिद खान

एमआयडीसी पोलीस ठाण्यात जवळ बंद कंपनीच्या आवारात वृद्धाचा जळालेल्या मृतदेह

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या जवळ असलेल्या एका बंद कंपनीच्या आवारातून सुरक्षा रक्षकाच्या जळुन मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ७:०० वाजता उघडकीस आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की श, रामेश्वर कॉलोनी जवळील रामनगर येथील रहवासी ईश्वर देवराम आहिरे ( वय-६६) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असुन सुरक्षा रक्षकाचे उदरनिर्वाहन करुन आपला काम करत होते। एमआईडीसी पोलिस ठाण्यात समोरिल बाजूस असलेल्या विक्रम प्लास्टिक बंद कंपनी गुरुवारी १९ जानेवारी रोजी सकाळी ८:३० वाजता सुरक्षा रक्षक म्हणून रात्री काम करून परतलेले काशिनाथ मराठे यांनी गेट उघडताच त्यांना काहीतरी जळत असल्याचे दिसून आले. त्यांनी पहिले असता एक जळत असल्याचे समजले. मराठी यांनी लागलीच एमआयडीसी पोलिसांना कळविले.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, इम्रान बॅग, समाधान टाकळे,हे पथकासह पोहचले आहेत. एमआयडीसी पोलीसात लालसींग शुभम ठाकुर ( वय-३०) यांनी खबर दिली आहे. ईश्वर देवराम अहिरे, यांच्या घातपात झाला की त्यांनी आत्महत्या केली. अशा आशयाने तपास सुरू आहे. या याप्रसंगी फॉरेनिक्स लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून चौकशीला सुरुवात केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!