ताज्या घडामोडी

ब्रह्माकुमारी सेवाकेंद्रात गणवेश वितरण कार्यक्रम

ब्रह्माकुमारी सेवाकेंद्रात
गणवेश वितरण कार्यक्रम

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा येवला पटेल कॉलनी या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत गणवेश वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला ब्रह्माकुमारी सेवाकेंद्रा मध्ये दर रविवारी सकाळी नऊ ते साडेदहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी बालसंस्कार केंद्राचे आयोजन करण्यात येते या ठिकाणी मुलांना मूल्यशिक्षण,सकारात्मक चिंतन,स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन,मेडिटेशन,राजयोग,
विविध प्रकारच्या कला व गुण वृद्धिंगत करण्याचे मार्गदर्शन, मोटिवेशनल स्पीच,विविध खेळ सर्वांगीण व्यायाम व ईश्वरीयज्ञान शिकविण्यात येते स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत श्री.राजेश सुखराजजी भंडारी यांचे परिवारातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहाच्या 24 विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मोफत वितरित करण्यात आला.स्वर्गीय श्रीमती लीलावती सुखराजजी भंडारी यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.सदर प्रसंगी भंडारी परिवारातील श्री.राजेश भंडारी,श्री.अनिल मुथा,श्री.रोशन भंडारी,
श्री.भूषण भंडारी,
श्री.अंकुश ललवाणी,श्री.विशाल
चंडालिया तसेच ब्रह्माकुमारी परिवारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहाचे अध्यक्ष श्री.प्राध्यापक सिताराम वस्तीगृहाचे अधीक्षक श्री.खैरनार सर,सौ.पूजा मेहता,सौ.कल्पना निकुंभ,रत्ना राजगुरू, कुमारी रूपाली नागपुरे,सौ.दिपाली जेजुरकर, सौ.शारदा पैठणकर, द्रौपदी माता पैठणकर,सौ.रेणूदेवी राजेंद्र शाह,सौ.विद्या छतानी सौ.संध्या छताणी,सौ.सुमन जाधव,जनामाता गोसावी,सौ.भारती केकान,सौ.सोनाली झूटिंग व इतरही सदस्य उपस्थित होते, याप्रसंगी सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.स्वागत प्रसंगी स्वातंत्र्य दिनावर विशेष नृत्य सादर करण्यात आले,कु.श्रेया केकान, कु.श्रद्धा शूटिंग या मुलींनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. श्री राजेश भंडारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले श्री सिताराम निकुंभ यांनी मुलांना मार्गदर्शन केले.यावेळी सर्वांना ईश्वरी प्रसादाचाही लाभ मिळाला.कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन राजयोगिनी ब्रह्माकुमारी नीतादीदी व ब्रह्माकुमारी अनुदीदी यांनी केले. प्रत्येकाच्या हातात भारताचा फडकवून देशाविषयीचा आदर मेरा देश मेरा तिरंगा सादर करण्यात आला

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!