ताज्या घडामोडी

जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने कामण आश्रम शाळेत मूलींसाठी समुपदेशन शिबीर आयोजित करण्यात आले.*

*जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने कामण आश्रम शाळेत मूलींसाठी समुपदेशन शिबीर आयोजित करण्यात आले.*

*सुहास पांचाळ / पालघर जिल्हा प्रतिनिधी*

भिवंडी/कामण : दि: १४ : जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने सध्या महिलांवर होणारा अत्याचार व तो कसा रोखावा तसेच भविष्यात येणाऱ्या अडचणी व संकटं याबाबत भिवंडी शहरातील कामण आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले.
त्यानुसार त्यांना दैनंदिन जीवनात कसं रहायचे , येणाऱ्या आव्हानांना कसे सामोरे जायचे, स्वतःचं रक्षण स्वतः कसं करायचे, स्वतः मनात कोणतेही नकारार्थी विचार मनात न आणता आपल्या मनावर कसा ताबा मिळवायचा. एक स्री म्हणून स्वतःला अबला न समझता सबला समजायचं
अशा विविध विषयावर समाजसेविका अभिलाषा वर्तक यांनी मोलाचं मार्गदर्शन केले.
यासमयी शाळेतील विद्यार्थिनींना मोलाचं मार्गदर्शन केले म्हणून सर्व शिक्षकांनी समाजसेविका अभिलाषा वर्तक व जिजाऊ संस्थेचे आभार व्यक्त केले.
यावेळी आश्रम शाळेचे शिक्षक वर्ग व जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या स्वयंसेविका श्रीमती अर्चना पाटील उपस्थित होत्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!