ताज्या घडामोडी

रस्त्याचे 10-10 लाखाचे दोन तुकडे का केले याची चौकशी करावी आणि या रस्त्यासाठी मंजूर असणारा निधी याच ठिकाणी खर्च करावा इतरत्र वळवू नये

मिरज प्रतिनिधी
मुज्जफर काझी
प्रभाग क्रमांक 20 मधील बसवेश्वर चौक ते शास्त्री चौक या रस्त्याचे काम प्रभागातील नागरिकांच्या तक्रारीमुळे उपायुक्त मॅडम यांनी कर्मचाऱ्यांच्या सोबत भेट देऊन पाहणी करून थांबविण्याचे आदेश दिले होते नागरिकांच्या मागणीनुसार आज सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेचे आयुक्त साहेब यांना नगरसेविका सौ संगीता अभिजीत हारगे यांनी प्रभागातील नागरिकांसोबत जाऊन निवेदन दिले. या निवेदनामध्ये हा रस्ता अखंड असताना या रस्त्याचे 10-10 लाखाचे दोन तुकडे का केले याची चौकशी करावी आणि या रस्त्यासाठी मंजूर असणारा निधी याच ठिकाणी खर्च करावा इतरत्र वळवू नये तसेच नागरिकांच्या मागणीनुसार संपूर्ण रस्ता उकरून रस्त्याची उंची वाढणार नाही याची दक्षता घेऊन काम करून द्यावे अशी आयुक्तसो यांना विनंती केली.
यावेळी नगरसेविका संगीता हारगे, माजी महापौर विवेक आप्पा कांबळे, अभिजीत दादा हारगे,विपुल दादा केरीपाळे,राजू दादा माळी,जावेद डगले,विनायक कडोले,रमेश निकम, यासीन मुल्ला,प्रमोद नेर्लेकर,अजित हारगे उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!