ताज्या घडामोडी

तात्या भैय्या चे बेमुदत उपोषण तूर्तास स्थगित

तात्या भैय्या चे बेमुदत उपोषण तूर्तास स्थगित श्रीकांत उपाध्ये कवठेसार प्रतिनिधी. 5 ऑक्टोंबर रोजी शिरपूर येथीलअंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिरात श्वेतांबर व दिगंबर पंथीय आमने-सामने संघर्ष निर्माण झाला होता. पार्किंग च्या जागेवर लावलेला सभा मंडप त्वरित काढण्यासाठी ब्रह्मचारी तात्या भैय्या उपोषण ला बसले होते. प्रशासनाच्या मध्यस्थीने उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले व दोषी व्यक्तीस सक्त कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले या प्रकरणाची सखोल चौकशी करून अल्पसंख्यांक कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी. या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस विभागीय उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले होते. पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण दोन्ही पंथीयांचे ट्रस्टी बैठक घेऊन मार्ग काढण्यात आले . मात्र दोन्ही पंथीयाकडून असलेले कापडी मंडप कायम राहणार असल्याचे नायब तहसीलदार यांनी उपोषण स्थळी बोलताना सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!