ताज्या घडामोडी

*एम.एस.जी.एस. शिक्षण संकुलात मालेगाव पोस्ट विभागा तर्फे अमोल सोनवणे व मकरंद सोनवणे यांचा सत्कार*

*एम.एस.जी.एस. शिक्षण संकुलात मालेगाव पोस्ट विभागा तर्फे अमोल सोनवणे व मकरंद सोनवणे यांचा सत्कार*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुला मध्ये मालेगाव पोस्ट विभागातर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष रामनाथ काका एंडाईत हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी अमोल सुभाष सोनवणे व खजिनदार मकरंद सुधाकर सोनवणे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदनाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली.
मालेगाव पोस्टातर्फे सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यास ज्ञानेश्वर आर.खताळ (पोस्ट मास्तर,अंदरसुल),अमोल डी. पगार (पोस्टल असिस्टंस),शुभम एस.वाळुंज (ब्रांच पोस्ट मास्तर, सायगाव), गोविंद पी.परदेशी (पोस्ट अधिकृत आर.डी. एजंट)
हे पोस्टाचे प्रतिनिधी हजर होते.
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत पोस्ट विभागातर्फे मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयमचे १०वर्षाच्या आतील मुलींसाठी *सुकन्या समृद्धी योजना* राबविण्यात आली होती.अमोल सोनवणे व मकरंद सोनवणे यांनी स्वखर्चाने स्कुलच्या ५१ विद्यार्थिनीचे पोस्टात सुकन्या समृद्धी खाते उघडून दिले. संस्थेच्या या कार्याबद्दल सेक्रेटरी अमोल सोनवणे व खजिनदार मकरंद सोनवणे यांचा पुष्पगुच्छ , शाल-नारळ व पोस्टाचे प्रमाणपत्र देऊन मालेगाव पोस्ट विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यानंतर अमोल पगार यांनी आपल्या भाषणांत अमोल सोनवणे व मकरंद सोनवणे यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. तसेच पोस्टाच्या विविध योजनांची माहिती दिली.
याप्रसंगी स्कुलचे प्रिंसिपल अल्ताफ खान,ज्यु.कॉलेजचे प्रिंसिपल सचिन सोनवणे,गणेश सोनवणे,दीपक खैरनार,अमोल आहेर,प्रशांत बिवाल, माधुरी माळी, शर्मिला पवार, चेतना माकूने, सुनीता वडे, सुश्मिता देशमुख, आलिया खान आदी सह सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अजहर खतीब यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!