ताज्या घडामोडी

राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ च्या येवला तालुकाध्यक्षपदी प्रतिभा चव्हाण यांची निवड*

*राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ च्या येवला तालुकाध्यक्षपदी प्रतिभा चव्हाण यांची निवड*
राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ नासिक हा ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी सातत्याने ओबीसी समाजाचे आरक्षण, शिष्यवृत्ती, वसतीगृह इ. अनेक प्रश्नासंदर्भात सातत्याने लढा देत आहे. तसेच महिलांसाठी प्रबोधनात्मक व सामाजिक उपक्रम राबवीत असतो.
नासिक जिल्ह्यातील विविध तालुक्यात महिलांना एकत्रित करण्याचे काम या महासंघाच्या माध्यमातून होत आहे. याच कामासाठी नासिक जिल्हा अध्यक्ष स्वाती प्रविण वाणी यांनी येवला तालुकाध्यक्ष पदासाठी प्रतिभा चव्हाण यांची नियुक्ती पत्र देवून नियुक्ती केली. तसेच भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात.
या प्रसंगी महासंघ राज्य उपसचिव कवीता मंडळ
मालेगाव तालुकाध्यक्ष जयश्री धामणे, शहराध्यक्ष हर्षिता आहिरे तसेच तालुका उपाध्यक्ष अलका भावसार, मनिषा आहिरे इ. उपस्थित होत्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!