ताज्या घडामोडी

एम.एस.जी.एस. शिक्षण संकुलात सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदनाना सोनवणे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त आदरांजली.*

*एम.एस.जी.एस. शिक्षण संकुलात सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदनाना सोनवणे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त आदरांजली.*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शिक्षण संकुलात सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांना जयंती निमित्त आदरांजली देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष सुदामराव सोनवणे हे होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सहकार व शिक्षण महर्षी गोविंदनाना सोनवणे यांच्या प्रतिमेला व पुतळ्याला तसेच मातोश्री शांताबाई सोनवणे यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली.कार्यक्रमाची प्रस्तावना अमोल आहेर यांनी केली.यानंतर इंग्लिश मिडीयम व सेमी इंग्लिश च्या विद्यार्थिनींनी नानाजींच्या जीवनावर आधारित गीत सादर केले.यानंतर प्रणिता कचरे, अलिना सैय्यद, स्नेहल वडाळकर यांनी आपले भाषण तर रोशनी जानराव हिने गीत सादर केले.यानंतर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध, चित्रकला व भाषण स्पर्धेच्या विजेत्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.अध्यक्षीय भाषणांत सुदामराव सोनवणे यांनी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्यात योगदान उपस्थितांना करून दिले.
याप्रसंगी संस्थेचे सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, संचालक मयुर सोनवणे, जीवन गाडे, राजेंद्र सोनवणे, उज्ज्वल जाधव, आकाश सोनवणे, अंदरसुल ग्रामपालिका मा. सरपंच व विद्यमान सदस्य सौ.विनिता अमोल सोनवणे, रामनाथ काका एंडाईत, संदीप वाकचौरे, पालक हरिभाऊ घोडके, कमळाकर देशमुख, भाऊसाहेब थोरात, मारुती वाकचौरे, द्वारकानाथ सोनवणे, महेंद्र वाकचौरे इ. पालक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रिंसिपल अल्ताफ खान, सेमीच्या मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, प्राचार्य सचिन सोनवणे, अजहर खतीब, दीपक खैरनार, गणेश सोनवणे, अजीम पटेल, अविनाश बोडारे, सचिन घोडके, पारस भगत, माधुरी माळी, अर्चना एंडाईत, निलिमा देशमुख, सुनील सपकाळ, सचिन बोढरे, जितेश व्यवहारे, सुवर्णा कडलग, दीपाली सोनवणे, मयुर भागवत आदी सह सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता वडे यांनी तर आभार प्रदर्शन दीपक खैरनार यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!