ताज्या घडामोडी

*येवल्यात दिव्यांग दांपत्यावर* *होतोय अन्याय* *अन्याय न* *थांबल्यास प्रहार स्टाईल ने* *समाचार घेतला जाईल*

*येवल्यात दिव्यांग दांपत्यावर* *होतोय अन्याय*
*अन्याय न* *थांबल्यास प्रहार स्टाईल ने* *समाचार घेतला जाईल*
येवला ता.२७ : येथील पारेगाव रोड लगत जुने घर घेऊन रहात असलेले श्री किरण हरिभाई पटेल व त्यांची पत्नी सौ.पुष्पा किरण पटेल हे दोघेही दिव्यांग असून कुबडी वा इतर आधाराशिवाय ते हिंडू फिरू शकत नाहीत, त्यांच्या सोयीनुसार घरात काही बदल करणे गरजेचे असल्याने त्यानुसार त्यांनी घरात आवश्यक ते बदल करण्याचे काम गेल्या एक ते दीड वर्षापूर्वी सुरू केले होते,त्यांच्या शेजारी राहत असलेले दीक्षित परिवार हे अपंगांना सूड भावनेने व त्यांचा तिरस्कार करीत असतात त्यांच्या कामात व्यत्यय आणणे,शिवीगाळ करणे,दगड मारणे हे नित्याचे झाले आहे.घराच्या आत अपंग व्यक्तीच्या सोयीने काम करीत असतांना कामगारांना धमकावणे, शिवीगाळ करत कामात अडथळे आणले जात आहे. नगरपालिकेकडे खोट्या तक्रारी करून नगरपालिका प्रशासनाची दिशाभूल करत आहेत.
दोघेही पती पत्नी दिव्यांग असल्याचा गैरफायदा सदर इसम घेत असल्याने दिव्यांगावर अन्याय अत्याचार करणे कायद्याने गंभीर गुन्हा असूनही नगरपालिका नगररचना विभाग व संबंधित दीक्षित परिवार कायद्याचे उल्लंन करत दिव्यांग दांपत्यावर अन्याय करीतआहेत.याबाबत संबंधित दांपत्यानी दिव्यांग मंत्रालय,महाराष्ट्र शासन यांच्याकडे दाद मागितली असून दिव्यांग मंत्रालय अध्यक्ष माननीय बच्चू कडू यांच्या कडे तक्रार दाखल झाल्याने त्यांनी अपंग आयुक्त,महाराष्ट्र राज्य,पुणे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत्.
याप्रकरणी प्रहार संघटना तालुका अध्यक्ष हरिभाऊ महाजन यांनी नगरपालिका उप मुख्याधिकारी श्री पगार यांची भेट घेऊन पत्र देत दखल घेण्याची विनंती केली असून दखल न घेतल्यास संबंधितांवर दिव्यांग अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करून
तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी श्री किरण पटेल,सौ पुष्पा पटेल यांचे समवेत तालुका अध्यक्ष हरीभाऊ महाजन,किरण चरमळ, सुनील पाचपुते, रामभाऊ नाईकवाडे,शांतीलाल पवार,साईनाथ मिटके,तान्हाजी कोल्हे,धवल पटेल आदी उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!