क्राईम

घरफोडीतील गुन्हेगारला अटक

घरफोडीतील गुन्हेगारला अटक

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील घरफोडीच्या गुन्हातील संशयित आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने तांबापुरा येथून गुरुवारी १ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ठाण्यात घरफोडीच्या दाखल गुन्ह्यातील आरोपी हा तांबापुरा परिसरात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. गुरुवारी १ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता पथकातील विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, विजय एस पाटील, प्रीतम पाटील, अविनाश देवरे, यांनी कारवाई करत संशयित आरोपी इस्तयाक अली राजीक अली रा. तांबापुरा जळगाव येथील अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!