ताज्या घडामोडी

नालासोपारा पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १८ मध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस

सुहास पांचाळ /पालघर जिल्हा प्रतिनिधी

नालासोपारा/ दि. २७.०९. : नालासोपारा पश्चिम येथील, प्रभाग १८ मधील निळेगांव व श्रीप्रस्थ परिसरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातलेला असुन हे कुत्रे टोळक्याने मोकाट फिरत आहेत. याचा फटका मोठया प्रमाणात सर्वसामान्य जनतेला होत आहे.

मुख्य करून लोकांच्या अंगावर धावत जाणे , हातामध्ये असलेली पिशवी खेचून घेणे, लहान मुले खेळत असतांना त्यांच्यावर धावत जाणे महिलाही ह्याला अपवाद नाहीत.

रात्री अपरात्री एकमेकांच्या अंगावर भुंकत बसून लोकांची झोपमोड करणे असले प्रकार वाढत असून त्याचा नाहक त्रास जनतेला होत आहे.

विशेषतः लहान मुलांचा चावा घेणे. त्यांच्या अंगावर धावून जाणे. त्यामुळे लहान मुलांना प्रतिकार सुद्धा करता येत नाही. तसेच दुचाकी स्वाराच्यामागे लागणे. त्यांच्या पायाचा चावा घेणे असले प्रकार सर्रासपणे घडत आहेत. त्यामुळे ह्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे अत्यंत आवश्यक झाले असून लवकरात लवकर कारवाई करावी असे निवेदन आज भाजप ओबीसी जिल्हा सरचिटणीस श्री. निलेश राणे यांनी नालासोपारा,प्रभाग समिती ‘ई’ कार्यालयात तक्रार अर्ज दिला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!