ताज्या घडामोडी

*प्रा.अमृता उत्तमराव जाधव यांना मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर यांचे तर्फे ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरवण्यात आले*

*प्रा.अमृता उत्तमराव जाधव यांना मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर यांचे तर्फे ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरवण्यात आले*
पोलीस टाईम्स न्यूज/ सुनिलआण्णा सोनवणे.

*चांदवड*: मविप्र संस्था संचालित के टी एच.एम.महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागातील कार्यरत प्राध्यापिका अमृता उत्तमराव जाधव यांना शिक्षण व आरोग्य विषयक कार्याबद्दल नुकतेच नागपूर येथील मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेतर्फे ‘ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने ‘ गौरविण्यात आले.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड नितीन ठाकरे,सभापती बाळासाहेब क्षिरसागर,संचालक नंदकुमार बनकर,सेवक संचालक सी डी शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ नितीन जाधव,एस एस पवार,वाय एम शिंदे,एस के जामदार,आर एस तुंगार,डी के पाटील,डॉ बाळासाहेब गुंजाळ,युवराज ठाकरे,तानाजी मुसळे,रेणुका मुसळे,अक्षय जाधव, अॅड प्रकाश शिंदे,उत्तमराव जाधव,माणिकराव गोडसे उपस्थित होते.

गेल्या मे महिन्यात त्यांना रिसर्च एज्युकेशन सोल्युशनतर्फे बेस्ट रिसर्चर अवॉर्ड देखील मिळाला आहे.अध्यापनाचे कार्य करीत असतांनाच त्यांनी आतापर्यंत १० हून अधिक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय रिसर्च पेपर पब्लिश केलेले असून टी वाय बी एस्सी ची दोन पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. गेल्या दीड वर्षापासून त्र्यंबकेश्वर जवळील सामुंडी,धाडोशी,पुलाची वाडी इ.आदिवासी भागात ५ वर्षाआतील कुपोषित बालके व मातांच्या आरोग्यविषयक सेवेसाठी त्या कार्यरत आहेत. त्यांच्या ” Pesticide Detecting plate” व Modified Petri Plate या दोन पेटंटला भारत सरकार चे पेटंट प्राप्त झाले आहे. मायक्रोबायोलॉजी विषयातील हे पहिलेच पेटंट असून तो मिळवण्याचा मान मिळाला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!