ताज्या घडामोडी

चांदवड येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विदयार्थ्यांनी चांदवड पर्यटनासाठी केला आराखडा सादर.

*चांदवड येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विदयार्थ्यांनी चांदवड पर्यटनासाठी केला आराखडा सादर.*
पोलिस टाईम्स न्युज/ सुनिलअण्णा सोनवणे

*चांदवड* : येथील नॅक मानांकित ‘अ’ दर्जाच्या श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य विभागाच्या विदयार्थ्यांनी चांदवड गावासाठी पर्यटनाचा प्रारूप आराखडा सादर केला आहे.

चांदवड गावाला आधीपासूनच पर्यटन, पर्यावरण आणि प्राचीन प्रतिकृती यासाठी ओळखले जाते. यामध्ये श्री अहिल्यादेवी होळकर यांचा रंगमहाल, पूर्वेस रेणुकामाता मंदिर, उत्तरेस इच्छपूर्ती गणेश मंदिर आणि श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर या सर्व पर्यटकीय गोष्टी परिसरातील पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे या सर्व गोष्टींचा आधार घेऊन या विद्यार्थानी चांदवड गावासाठी पर्यटनाचा प्रारूप आराखडा बनवला आहे. या आराखड्यात प्रामुख्याने नैसर्गिक साधनांचा पुरेपूर वापर, पर्यटकांसाठी पोषक वातावरण निर्मिती अशा विविध गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. या आरखड्याचा मुख्य हेतू पर्यटकांसाठी पर्यटन आणि गावाकऱ्यांसाठी रोजगार निर्मिती हा आहे.

रोपवे ,सन सेट पॉइंट , वॉटर राईड, पार्क , बोटिंग हे या आराखाड्याचे लक्ष्यवेधि घटक आहेत. या आराखड्यात दोन रोपवेंचा वापर करण्यात येणार आहे . श्री चंद्रेश्वर गडाच्या परिसरात सन सेट पॉइंट बनवण्यात येणार आहे . हा प्रकल्प पूर्ण दोन दिवसांच्या फेरीसाठी बनवला आहे.

या प्रकल्पाच्या प्रारूप आराखड्याच्या निर्मितीवर विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यानी दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ रोजी हा आराखडा जिल्हा परिषद नाशिक येथील मुख्य कार्यकारी अधिकारी असिमा मित्तल व मा.कार्यकारी अभियंता पंकज मेतकर यांना साधार केला आहे. त्यानी तो आरखडा तपासून त्यावर विचार करण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे .या आराखड्यात विद्यार्थ्यांचा आणि मार्गदर्शक् प्रा. एल.बी.पवार व प्रा. ए. के.ठाकरे यांचा मोठा वाटा आहे. हा प्रकल्प बनवणाऱ्या विदयार्थांची नावे पुढील प्रमाणे आहेत .स्नेहींत अनिल पवार .हर्षल सुरेश गायकवाड.गौरव रावसाहेब ठोंबरे, श्रीकांत मच्छिन्द्र देशमुख, , निकिता प्रकाश आहेर व साक्षी सुनील गलांडे आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या यशाबद्दल संस्थेच्या विश्वस्त समितेचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, विश्वस्त समितेचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमार लोढा, सेक्रेटरी जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी,प्रबंध समितीचे सहमानद सचिव व समन्वयक झुंबरलाल भंडारी व सुनीलकुमार चोपडा आदींसह सर्व विश्वस्त मंडळ व प्रबंध समितीचे सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. तातेड , उपप्राचार्य डॉ.एम. आर. संघवी, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!