ताज्या घडामोडी

कडवे येथे 26 एप्रिल रोजी कुस्ती मैदानाच भव्य दिव्य आयोजन.

कडवे येथे 26 एप्रिल रोजी कुस्ती मैदानाच भव्य दिव्य आयोजन.

पोलीस टाईम्स न्यूज 24 प्रतिनिधी: प्रकाश कांबळे ( मलकापूर शहर )

  कडवे तालुका शाहूवाडी येथील श्री विठ्ठलाई देवी यात्रेनिमित्त  ग्रामस्थ ‘ मुंबईकर मंडळी व ग्रामपंचायत कडवे यांच्या वतीने महाराष्ट्रातील, अनेक महाराष्ट्र केसरी पैलवान व नामवंत मल्लाचें  कुस्ती मैदान  बुधवार दिनांक: 26 एप्रिल रोजी  आयोजित केले आहे . या मैदानाचा पंचक्रोशीतील कुस्ती शौकीनानी लाभ घ्यावा असे आवाहन शाहूवाडी पंचायत समितीचे माजी सभापती विजय खोत व डॉ.भारत देवळेकर सरकार यांनी केले आहे.
सालाबाद प्रमाणे विठलाई देवीच्या यात्रेनिमित्त यावर्षी प्रथम क्रमांकाची लढत महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे  विरूध्द पंजाब केसरी सत्येंद्र कुमार ‘तर द्वितीय क्रमांकाची लढत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज  पाटील विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांच्यात होणार आहे. तर तिसऱ्या क्रमांकासाठी निर्को महाराष्ट्र केसरी समीर देसाई विरुद्ध कर्नाटक केसरी कार्तिक काटे यासह अनेक चटकदार कुस्त्या होणार आहेत. तर लहान  मल्ल निखिल माने विरुद्ध सोहम पाटील ही एक नेत्र दीपक कुस्ती होणार आहे .या कुस्ती मैदानासाठी गावातील अनेक दानशूर देणगीदारां कडून हे मैदान संपन्न होत आहे. या मैदानाचा पंचक्रोशीतील कुस्ती शौकीनानी लाभ व आदर्श घ्यावा असे आव्हान माजी सभापती विजय खोत, समाजसेवक डॉ. भारत देवळेकर सरकार व यात्रा कमिटी, कडवे यांनी केले आहे.
या कुस्ती मैदान पाहण्याकरता अनेक जिल्ह्यातील, तालुक्यातील दिग्गज व्यक्तिमत्व उपस्थिती लावणार आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!