ताज्या घडामोडी

मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शिक्षण संकुलात वार्षिक क्रीडा महोत्सवाचे मोठ्या उत्साहात उद्धाटन.

मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शिक्षण संकुलात वार्षिक क्रीडा महोत्सवाचे मोठ्या उत्साहात उद्धाटन.
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम,सेमी इंग्लिश व ज्यु.कॉलेज मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक व प्रसिद्ध लॉन टेनिसपटू श्रीकांत पारेख व एन्जोकेम हायस्कुलचे एन.सी.सी. (क्रीडा) शिक्षक विजय क्षिरसागर होते, तर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे होते.प्रमुख पाहुण्यांचे आगमन होताच स्कुलच्या प्रवेशद्वारावर शाळेतील विद्यार्थिनींनी पाहुण्यांना तिलक करून व ओवाळून स्वागत केले. बँड पथक, झांज आणि परेड करून पाहुण्यांना मंचावर आणण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे श्रीकांत पारेख व विजय क्षीरसागर यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकवून व सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. यानंतर इ.नववीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.संस्थेच्या वतीने पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. संस्थेचे संचालक तथा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी प्रा.राजेंद्र गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.शिक्षक अमोल आहेर यांनी पाहुण्यांचा परिचय उपस्थितांना करून दिला.यानंतर नवनीत मास्टरस्ट्रोक चित्रकला स्पर्धा व रंगोत्सव सिलेब्रेशन, मुंबई यांच्या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करण्याऱ्या विद्यार्थ्यांच्या नावाची घोषणा शिक्षक अजहर खतीब यांनी केली.त्यांचा सत्कार पाहुण्याच्या हस्ते करण्यात आला.क्रीडा महोत्सवात चार विद्यार्थ्यांचे व चार विद्यार्थिनींचे हाऊस (ग्रुप) करण्यात आले आहे.यात मुलांच्या हाऊसचे नावे अनुक्रमे एम.एस.धोनी, रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव व कपिल देव तर विद्यार्थिनींचे हाऊस पुढील प्रमाणे राजमाता जिजाबाई, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, कल्पना चावला असे होते.
सर्व हाऊसने यानंतर परेड करून पाहुण्यांना सलामी दिली.परेड हेड बॉय नरेंद्र देशमुख, हेड बॉय प्रणव पुंड व हेड गर्ल ऋतुजा भोसले यांनी पाहुण्यांना हाऊस निरीक्षणासाठी आमंत्रीत केले. निरीक्षण झाल्यानंतर आदिती खैरनार हिने खेळाची प्रतिज्ञा घेतली.सर्व हाऊस लीडरनी मशाल मैदानात फिरवून शेवटी प्रमुख पाहुण्यांच्या हातात दिली पाहुण्यांनी ज्योत पेटवून क्रीडा महोत्सवाला सुरुवात केली. श्रीकांत पारेख यांनी आपल्या भाषणांत खेळाडूंसाठी खेळा बरोबर योग्य आहाराची गरज असते असे सांगितले दुसरे प्रमुख पाहुणे क्षिरसागर यांनी खेळाचे महत्त्व सांगितले.अध्यक्षीय भाषणांत अरुण भांडगे यांनी खेळासाठी शिस्त आवश्यक असते असे व खेळाने तन व मन निरोगी राहते असे नमूद केले.चार दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात क्रिकेट, कबड्डी, व्हॉली बॉल, रनिंग, लिंबू चमचा, थाळी फेक, गोळा फेक, रस्सी खेच, कॅरम, बुद्धिबळ, रिले रेस, मॅरेथॉन इ. असे विविध खेळ समाविष्ट आहे.
याप्रसंगी अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, संचालक राजेंद्र सोनवणे, अंदरसुल ग्राम पालिकेच्या मा.सरपंच तथा विद्यमान सदस्या विनीता अमोल सोनवणे, अर्चना मयूर सोनवणे, रामनाथ काका एंडाईत, मंगेश शिंदे, निलेश जावळे, भागिनाथ थोरात, इंग्लिश मिडीयमचे प्रिन्सिपल अल्ताफ खान, ज्यू.कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, दिपक खैरनार, गणेश सोनवणे, सुनील सपकाळ, अजीम पटेल, पारस भगत, सचिन घोडके, राजेश कांबळे, महेश मेहत्रे, जितेश व्यवहारे, संतोष जाधव, माधुरी माळी, नीलिमा देशमुख, अर्चना एंडाईत, सुनीता वडे, निदा फारुकी, साक्षी देशमुख, प्रतिक्षा चव्हाण, सुषमा सोनवणे, आरती जगधने, दीपाली सोनवणे, कांचन गायकवाड, सुवर्ण म्हस्के, सर्व सन्माननीय पालकवर्ग, इ. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या खैरनार व मुनैजा खान यांनी केले, तर आभार अझहर खतीब यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!