ताज्या घडामोडी

*एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी.

    *एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी.*
    अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल येथे राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक अमोल आहेर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला तसेच सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर शिक्षक अझहर खतीब यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. शिक्षिका शर्मिला पवार, सुस्मिता देशमुख, नीलिमा देशमुख, सुनीता वडे, सोनाली साताळकर, प्रियंका कहार, समरीन अन्सारी, विद्यार्थिनी ईश्वरी कुरहे, प्रिन्सिपल अल्ताफ खान यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतील चिमुकले विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाबाई, शिवाजी महाराज, श्री राम इ. यांचे वेशभुषा धारण केले होते. अध्यक्षीय भाषणात शिक्षक अमोल आहेर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. तसेच जयंती निमित्त शाळेत फॅन्सी ड्रेस, कविता, वकृत्व इ.स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
    सदर कार्यक्रमास मंगेश शिंदे, माधुरी माळी, अर्चना एंडाईत, प्रतिक्षा चव्हाण, गणेश सोनवणे, अजीम पटेल, पारस भगत, सचिन घोडके, राजेश कांबळे, अलमास अन्सारी, मयुरी गोरे सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका निदा फारुकी यांनी केले तर आभार शिक्षक दिपक खैरनार यांनी मानले.

    Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!