क्राईम

८७ हजार ४८० रुपये किंमतीच्या ३९ ज्वारीच्या गोण्या; चोरी करणाऱ्या तिघांना अटक

८७ हजार ४८० रुपये किंमतीच्या ३९ ज्वारीच्या गोण्या; चोरी करणाऱ्या तिघांना अटक

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातुन तीन व्यापाऱ्यांच्या मालकीच्या ८७ हजार ४८० रुपये किमतीचे ज्वारीने भरलेल्या ३९ गोण्या दो जणांनी वाहनातुन चोरुन होते. या गृहातील ३ संशयित आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी बारा नोव्हेंबर रोजी सायंकाळी छे वाजता वरणगावत येथून अटक केली आहे.
त्यांच्यावर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रमेश किसनराव माळी ( वय-५८) विनायक ज्ञानदेव राणे, आणि सुनील भगीरथ जाखेटे यांचे धन्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकान समोर ३९ ज्वारीच्या गोण्या लावलेल्या होत्या. शुक्रवार ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ६:३० वाजेपर्यंत सय्यद कमाल अली ( वय- ५५) आणि फारुख अब्दुल रजाक कच्ची ( वय-५६) रा. वरणगाव ता. भुसावळ यांनी पिकअप व्हॅन ( जमेची ०४ ईएल ८३०२) या वाहनाने वाहनातुन ८७ हजार ४८० रुपये किमतीच्या ३९ गोण्या चोरुन नेल्या.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी सैय्यद अमर अली (वय- ५५) फारुक अब्दुल रज्जाक कच्ची ( वय-५६) , राहत आली सैय्यद अमर अली ( वय-२३) सर्व रा. अक्सा मश्जिद जवळ अक्सा नगर वरणगाव ता. भुसावळ जि. जळगाव यांना अटक केली. तिघांना न्यायालयात हजर केले असतात १५ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!