ताज्या घडामोडी

छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून….* *मूलभूत सुविधा योजनेतून येवला मतदारसंघातील ग्रामीण भागात १० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर*

*छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून….*

*मूलभूत सुविधा योजनेतून येवला मतदारसंघातील ग्रामीण भागात १० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर*

*नाशिक,येवला,दि.६ सप्टेंबर:-* राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून मूलभूत सुविधा २५१५ योजनेतून येवला मतदारसंघातील ग्रामीण भागात १० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय,सभामंडप, स्मशानभूमी शेड, संरक्षण भिंत,रस्ता काँक्रीटीकरण, सामाजिक सभागृह यासह विविध विकास कामांचा समावेश असून नागरिकांना या मूलभूत सुविधांचा लाभ मिळणार आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला तालुक्यातील
अंगणगांव येथे स्मशानभुमी शेड, पिंपळखुटे बु. येथे श्रीकृष्ण मंदिरशेजारी सभामंडप बांधण्यासाठी प्रत्येकी १५ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. बाभुळगांव खु.- बाभुळगांव बु. ता. येवला येथे गावांतर्गत रस्ता कॉक्रिटीकरण व पेव्हडीप करण्यासाठी २५ लक्ष, पिंप्री येथे स्मशानभुमीस संरक्षण भिंत बांधण्यासाठी १० लक्ष, राजापूर भोरकडे वस्ती येथे सभागृह, सभामंडप, रहाडी येथे ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत सभामंडप, महालखेडा पा. येथे ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत सभामंडप, पांजरवाडी आगवण वस्ती येथे मारुती मंदिराजवळ सभामंडप बांधण्यासाठी प्रत्येकी १५ लक्ष, ग्रा.पं. नगरसूल अंतर्गत महालगाव येथे प्रवेशद्वार बांधण्यासाठी १० लक्ष, जायदरे येथे सभामंडप, आहेरवाडी येथे सभामंडप, हडपसावरगाव येथे सभामंडप,अंदरसूल येथे शनिमंदिर परिसर कॉक्रीटीकरण करणे व परिसर सुशोभीकरण, मुखेड येथे गावांतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण,
पाटोदा येथे गावांतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करण्यासाठी प्रत्येकी १५ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.

नगरसूल येथे सामाजिक सभागृह बांधण्यासाठी २५ लक्ष, पिंपळखुटे बु, येथे श्रीकृष्ण मंदिरासमोर सभामंडप बांधण्यासाठी ३० लक्ष, चांदगांव,येथे गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी १५ लक्ष, अंदरसूल देशमुख गल्ली मारुती मंदिर सुशोभिकरण करण्यासाठी २० लक्ष, बदापूर येथे गावांतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण, बल्हेगांव येथे गावांतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करण्यासाठी प्रत्येकी १० लक्ष, भारम येथे गावांतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करण्यासाठी १५ लक्ष, धामोडे येथे गणपती मंदिरासमोर सभामंडप बांधण्यासाठी १० लक्ष, सायगांव येथे शनिमंदिर सभागृह बांधण्यासाठी १५ लक्ष, कुसूर येथे गावांतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करण्यासाठी १२ लक्ष, अंदरसूल येथे रोहिदास महाराज मंदिर सभामंडप बांधण्यासाठी १५ लक्ष, खिर्डीसाठे येथे आदिवासी वस्तीत सभामंडप बांधण्यासाठी १५ लक्ष, कुसूर येथे जि.प. शाळा परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ३ लक्ष, न्याहारखेडे बु. येथे कब्रस्तानाला संरक्षक भिंत बांधणे व अंतर्गत सुविधा करण्यासाठी प्रत्येकी १० लक्ष, निमगांव मढ ता. येवला येथे ग्रामपंचायतच्या मोकळ्या जागेवर मारुती मंदिरजवळ सभामंडप बांधण्यासाठी १५ लक्ष,.मुखेड येथील ग्रामपंचायतच्या मोकळ्या जागेवर नवमहाराष्ट्र वाचनालय येथे वाचनालय इमारत बांधकाम करण्यासाठी १५ लक्ष, विसापूर येथे गावांतर्गत (हनुमान गल्ली) रस्ता काँक्रिटीकरण, पिंपळगाव लेप येथे गावांतर्गत (उशिर घर ते सुतार गल्ली) पर्यंत रस्ता कॉक्रिटीकरण, कातरणी येथे खंडेराव महाराज मंदिर परिसरात कॉक्रिटीकरण, सोमठाणदेश येथे विठ्ठल मंदिर ते मारुती मंदिर पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी प्रत्येकी १० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात
आला आहे.

तसेच निफाड तालुक्यातील सुभाषनगर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संरक्षण भिंत बांधकाम करण्यासाठी १० लक्ष, पाचोरे बु. येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संरक्षण भिंत बांधण्यासाठी १५ लक्ष, धारणगांव खडक येथे आदिवासी वस्तीमध्ये सभामंडप, थेटाळे येथे वडजाई माता व हनुमान मंदिर जवळ ग्रा.पं.च्या मोकळ्या जागेवर सभामंडप, सुभाषनगर येथे ग्रा.पं.च्या मोकळ्या जागेवर सभामंडप बांधण्यासाठी प्रत्येकी १५ लक्ष, सारोळे खु. येथे जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र इमारत / सभामंडप, पिंपळगांव नजिक येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधण्यासाठी प्रत्येकी २० लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.

निफाड तालुक्यातील वाहेगांव येथे ग्रामपंचायत मोकळ्या जागेत सभामंडप, किसनवाडी येथील ग्रामपंचायत मोकळ्या जागेवर कृष्णनगर येथे सभामंडप, गोंदेगाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण, देवगाव मिळकत नं. ५०६ येथे ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेवर सभामंडप, कानळद मिळकत नं. ५ येथे ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेवर सभामंडप/ सभागृह, शिरवाडे येथे गोरक्षनाथ मंदिर परिसरात सभामंडप, रुई येथे स्मशानभुमीचे बांधकाम, कोळगांव येथे नविन स्मशानभुमीचे बांधकाम करणे व अनुषंगिक कामे,खेडलेझुंगे येथे नविन स्मशानभुमीचे बांधकाम करणे व अनुषंगिक कामे, धारणगांव विर येथे स्मशानभुमीचे काम करणे व अनुषंगिक कामे, धारणगांव खडक येथे स्मशानभूमीजवळ कॉक्रिटीकरण करण्यासाठी प्रत्येकी १५ लक्ष, मरळगोई खु. येथे स्मशानभुमी शेड व घाट बांधण्यासाठी २० लक्ष, ब्राम्हणगांव वनस येथे स्मशानभुमी शेड बांधण्यासाठी १५ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

त्याचबरोबर निफाड तालुक्यातील लासलगांव येथे स्मशानभुमी सुधारणा व आसनव्यवस्था २० लक्ष, गोंदेगांव येथे स्मशानभुमीकडे जाणा-या रस्त्याचे कॉक्रिटीकरण करण्यासाठी १५ लक्ष, पिंपळगांव नजिक शास्त्रीनगर येथील गांवांतर्गत रस्ता रस्ता कॉक्रिटीकरण करण्यासाठी २० लक्ष, विंचूर येथे अंगणवाडी शाळेजवळ नाल्यावर सिडीवर्क बांधण्यासाठी १० लक्ष, ब्राम्हणगाव विंचूर येथे ग्रामपंचायत कार्यालय ते गायकवाड वस्ती रस्ता कॉक्रीटीकरण करण्यासाठी १५ लक्ष, शिरवाडे वाकद येथे मराठी शाळा ते कुर्ला नाल्यापर्यंत रस्ता मजबुतीकरण करण्यासाठी १० लक्ष, पिंपळगाव नजिक बहुउद्देशीय इमारत बांधकाम करण्यासाठी २५ लक्ष, कोटमगाव येथे सभामंडप बांधकाम करण्यासाठी १५ लक्ष, हनुमान नगर येथे जि.प.शाळा खोली बांधण्यासाठी १५ लक्ष, गाजरवाडी येथे गावअंतर्गत रस्त्याचे कॉक्रीटीकरण करण्यासाठी १० लक्ष, विठ्ठलवाडी येथे जि.प.शाळा खोली बांधण्यासाठी १५ लक्ष,
विंचूर येथे सावता महाराज मंदिरासमोर सभामंडप बांधण्यासाठी २० लक्ष, कानळद येथे स्मशानभूमी सुविधा करण्यासाठी ५ लक्ष असे एकूण१० कोटी रुपयांचे विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!