आरोग्य व शिक्षण

.एस.जी.एस.शिक्षण संकुलात मा.छगनरावजी भुजबळ साहेबांच्या अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण.

सचिन वखारे

अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल,सेमी इंग्लिश व ज्यु.कॉलेजमध्ये मा.छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या दि.१५ ऑक्टोबर रोजी साजरा होणाऱ्या अमृत महोत्सव वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद हिले साहेब (तहसीलदार,येवला),
निलेश पाटोळे (उप-शिक्षणाधिकारी, प्राथमिक,नाशिक जिल्हा) हे होते तर अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक मयुर सोनवणे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व सहकार महर्षी , शिक्षण महर्षी स्व. गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली.संस्थेच्या वतीने तहसिलदार प्रमोद हिले साहेब व निलेश पाटोळे उपशिक्षणाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा -येवला यांच्यातर्फे आयोजित काव्य स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.आपल्या भाषणात प्रमोद हिले यांनी *’एक मूल एक वृक्ष’* ही संकल्पना एम.एस.जी.एस शिक्षणसंस्था यशस्वीपणे राबवित असल्याबद्दल प्रशंसा केली. अध्यक्षीय भाषणात मयुर सोनवणे यांनी तहसीलदार साहेबांच्याया ‘एक मूल एक वृक्ष’ अभियानाबद्दल प्रशंसा केली व मा.छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेच्या प्रांगणात १०१ झाडे लावल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाचे कौतुक केले.त्या १०१ झाडांच्या संगोपनाची जबाबदारी ही घेतली.तसेच अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व पदाधिकारी, शाळेचे शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मा.छगनरावजी भुजबळ साहेब यांना वाढदिवसाच्या लाख – लाख शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, प्रा.राजेंद्र गायकवाड, आकाश सोनवणे, जनार्दन जानराव, जीवनशेठ गाडे, उज्ज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे, डॉ.भगिनाथ जाधव, संगीताताई सोनवणे, लक्ष्मण सोनवणे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रिंसिपल अल्ताफ खान, प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, अजहर खतीब, दीपक खैरनार, गणेश सोनवणे, प्रशांत बिवाल, सुनील सपकाळ, सागर गाडेकर, अमजद अंसारी, माधुरी माळी, शर्मिला पवार, सुनीता वडे, सुश्मिता देशमुख,आलिया खान, चेतना माकुने यासह सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल आहेर यांनी केले तर आभार दीपक खैरनार यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!