ताज्या घडामोडी

शुयमा ब्राह्मण संस्थेच्या इंदिरानगर विभागात गुणवंतांचा सत्कार संपन्न, शैक्षणिक विद्यार्धी ४१ कलाक्रीडा क्षेत्रातील १२ , विशेष गुणवंत १५

इंदिरानगर प्रतिनिधी

कोविड महामारीचे संकटानंतर, शुक्ल यजुर्वेदीय माध्यदिन ब्राह्मण संस्थेचे नवीन नाशिक इंदिरानगर विभागाचा गुणवंत गौरव समारंभ , श्री दत्त मंदिर जिल्हा परिषद कॉलोनी चार्वाक चौक इंदिरानगर नाशिक येथे उत्साहात संपन्न झाला . हे कार्यक्रमाचे २८ वे वर्ष होते
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा जयंत भातंबरेकर , प्रा हेरंब गोविलकर तसेच संस्था अध्यक्ष सतीश शुक्ल , विभाग अध्यक्ष सौ राजश्री शौचे , संस्था कार्याध्यक्ष तुषार जोशी उपाध्यक्ष अनिल देशपांडे , कोषाध्यक्ष चंद्रकांत महाजन , शिक्षण समिती प्रमुख राजन कुलकर्णी, मंगल कार्यालय प्रमुख प्रमोद मुळे ,अवधूत कुलकर्णी , उदय जोशी, रवींद्र भसे , डॉ शरद कुलकर्णी हे होते
यावेळी इयता बालवाडी ते नववी पर्यंतचे ४१ शैक्षणिक गुणवंत विद्यार्धी , १२ कला क्रीडा क्षेत्रातील विध्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील १५ गुणवंतांचा म्हणजे एकूण ६८ गुणवंतांचा त्याचे कार्याबद्दल हृदय सत्कार प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आला
सुरवातीला उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक, विभाग अध्यक्ष राजश्री शौचे यांनी केले , त्यांनी सर्व गुणवंतांचे अभिनंदन करून उज्वल भविष्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या . तसेच मागील 3 वर्षात ज्यांनी देशासाठी कार्य केले तसेच कोविडकोविड काळात ज्यांनी मदत व सेवा कार्य केले त्या सर्वांना धन्यवाद दिले आणि सर्वाप्रति कृतज्ञाता व्यक्त केली , या सर्वांचे साठी हा प्रातिनिधिक सत्कार असल्याचे सांगितले
प्रा जयंत भातंबरेकर व त्यांचे सहकारी कार्यकर्ते, सहकार्य करणाऱ्या संस्था यांनी फार मोठ्या प्रमाणात अन्नधान्य शिधा वाटप केले आहे तसेच गरजूंना अनेक प्रकारे सहाय्य केले आहे तसेच प्रा हेरंब गोविलकर यांनी सेवाकार्यत मोठा सहभाग घेतला आहे असे उत्तम कर्तृत्ववान प्रमुख पाहुणे लाभल्याचे सांगितले ,त्यानंतर प पं विवेकानंद घोडके , पं मनोज जोशी यांचे मंत्रघोषात दीपप्रज्वलन होऊन श्री गुरुदेव दत्त , श्री गणेश मूर्ती आणि महर्षी याज्ञवल्क्य प्रतिमा पूजन करण्यात आले , गुरुजनांनी गुणवंतास मंत्राशिर्वाद दिला.
मागील 3 वर्षात कोविड व अन्य कारणाने दिवंगत झालेले सर्वाना विनम्र श्रद्धांजली वाहण्यात आली त्याचे निवेदन डॉ शरद कुलकर्णी यांनी केले
यावेळी शासन , महापौर , नगरसेवक , पोलीस / मनपा आयुक्त ,जिल्हाधिकारी , प्रिंट तसेच इलेट्रॉनिक मीडियाचे पत्रकार बंधूं , सोशिअल मीडिया, वैदयकीय क्षेत्र डॉक्टर्स , नर्सेस , पोलीस खाते , सेवाभावी संस्था , कार्यकर्ते , देणगीदार , विविध खात्यांचे कर्मचारी , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक , सेवाकार्य करणारे नागरिक , संस्था, रक्त तपासणी प्रयोग शाळा , रक्तपेढ्या , औषध पुरवठादार ,यांचे कोविड काळातील कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला व सर्वाना धन्यवाद देण्यात आले
प्रमुख पाहुणे प्रा जयंत भातंबरेकर , प्रा हेरंब गोविलकर यांचे परिचय सौ अर्चना रोजेकर , उदय जोशी यांनी करून दिले तर त्यांचे स्वागत सत्कार सतीश शुक्ल सौ राजश्री शौचे , अनिल देशपांडे यांनी केला
महर्षी योगीश्वर याज्ञवल्क्य ऋषी यांची माहिती संस्था कार्यवाह ऍड भानुदास शौचे यांनी दिली शिक्षण समिती प्रमुख राजन कुलकर्णी यांनी बक्षिसांचे स्वरूप सांगून गुणवंत विद्यार्थ्यांचे यादीचे वाचन केले त्यांना उदय जोशी यांनी सहाय्य केले
संस्थेतर्फे होणारा गुणवंत गौरव हा स्तुत्य उपक्रम आहे ,शैक्षणिक व विविध क्षेत्रातील गुणवंतांचे सत्कार करताना विशेष आनंद होत आहे, अशा कार्यक्रमांमुळे कार्य करणार्यांना प्रोत्साहन मिळते , मीडियाचे सजग कार्य समाजासाठी अत्यंत मोलाचे आहे ,असे उद्गगार प्रमुख पाहुणे जयंत भातंबरेकर यांनी काढले व सर्व गुणवंतांचे अभिनंदन केले
दुसरे प्रमुख पाहुणे प्रा हेरंब गोविलकर यांनी विध्यार्त्यांनी पुढे जाण्यासाठी मेहेनत घेतली पाहिजे तसेच नित्य गायत्री मंत्राची उपासना केली पाहिजे , व्यायाम केला पाहिजे असे मत व्यक्त केले , संस्था अध्यक्ष सतीश शुक्ल यांनीही विध्यार्थ्यानी कौशल्यपूर्ण ज्ञान मिळवले पाहिजे , नियमित व्यायाम केला पाहिजे असे सांगितले
आभार विभाग कार्याध्यक्ष सी व्ही महाजन यांनी मानले सौ मीरा धारणे यांनी पसायदान म्हंटले , प्रभावी सूत्रसंचालन सौ अपूर्वा पाठक यांनी केले
कार्यक्रमास सौ रत्ना भसे , सौ अनिता कुलकर्णी , ऍड सतीश बालटे , रवींद्र रोजेकर चंद्रशेखर गायधनी , प्रमोद मुळे, सुहासचंद्र भणगे , अवधूत कुलकर्णी , उदय जोशी सी व्ही महाजन, भरत कुलकर्णी , वैभव भणगे ,मनोज जोशी ,गजानन जाधव इंदिरानगर विभाग पदाधिकारी , समाजबांधव, मोठ्या संख्येने उपस्थित होते
ग्रुप फोटोने कार्यक्रमाची सांगता झाली
विशेष गुणवंत म्हणून यांचा झाला सत्कार-
श्री सतीश शुक्ल ( सातत्यपूर्ण सामाजिक , धार्मिक कार्य , कोविड काळातील कार्य व अन्नदान सेवा)
लक्ष्मण कुलकर्णी ( वैदयकीय– पॅथॉलॉजी) , पो उप निरीक्षक सुनील गीत ( राष्ट्रपती पुरस्कार जाहीर तसेच पोलीस खात्याततील उत्तम सेवा ) , कीर्तनकार ह भ प रवींद्रअग्निहोत्री , (दीर्घकाळ कीर्तन सेवा व विविध पुरस्कारांनी सन्मानित ),अनंतराव काजळे ( दीर्घ काळ समाजसेवा ) शरद दीक्षित ( गेले १६ वर्ष शुयमा चतुर्थी मंडळ संचालन) , गजानन देवचके ( अधिकारी पदावर सरकारी नोकरीत असताना १०० वेळा रक्तदान ) , पो सह उपनिरीक्षक राम जाधव ( इंदिरानगर व पोलीस खात्याचा प्रातिनिधिक सन्मान) , सौ प्रज्ञा पाटील ( योग विषयातील रेकॉर्ड व पंतप्रधानांचे हस्ते सन्मान , विरेन कुलकर्णी (समाजसेवा , विघनहरण हे मोठे ढोलपथकाचे संचालन ) , गोपालकृष्ण गर्गे ,आणि देविदास कुलकर्णी गुरुजी( श्री दत्तमंदिराची सातत्यपूर्ण सेवा )
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक रोहित गायधनी , विनायक गीत , राजेंद्र देशपांडे , विरेंन कुलकर्णी , प्रफुल्ल काजळे (सातत्यपूर्ण समाजसेवा , तसेच कोविड काळातील मदत जनसेवा , कोविड काळातील अंत्यविधी प्रक्रियेतील सहभाग)

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!