क्राईम

मोहाडी एका कुलुपबंद घरात ३ लाख ८८ हजार रुपयांच्या मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केले

मोहाडी एका कुलुपबंद घरात ३ लाख ८८ हजार रुपयांच्या मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केले

           प्रतिनिधी शाहिद खान            

जळगाव शहरात मोहाडी येथील एका कुलुपबंद कघरात सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रकमेच्या ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली आहे.
५० हजार रुपये रोख तसेच सोन्या चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख ८८ हजार रुपयांच्या मुद्देमालच्या चोरी प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, मोतीलाल मुकेश श्रावण सोनवणे (वय- ५२) हे बांधकाम व्यावसायिक मोहाडी येथील मूळ रहिवासी आहेत. मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने ते जळगावला राहतात. आपल्या मूळ गावी मोहाडी येथे जात असतात. मोहाडी येथील त्यांच्या घराच्या दरवाजा तुटला असून घरात चोरी झालेे सल्याची त्यांना लहान भावाकडून समजले. माहिती मिळाल्यामुळे मोतीलाल सोनवणे हे लागलीच मोहाडी येथे गेले असता चोरीचे प्रकार झाल्याचे त्यांना दिसून आले. घरातील सामान असताव्यस्त झाल्याचे त्यांना दिसून आले. या घटने प्रकरण एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!