ताज्या घडामोडी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस युवक काँग्रेस बेरोजगार दिवस म्हणून साजरा

लोणार: आज, १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस भाजपकडून जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त भाजपने देशभरात विविध कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे आयोजन केले आहे. मात्र, कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवाच्या दिवशी विविध मुद्द्यांना हात घालत आंदोलन केले आहे. बुलढाणा जिल्हा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे. बेरोजगारीला विरोध म्हणून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क पकोडे (भजे) विकून पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारविरोध केला आहे.
राज्यातील विविध मुद्द्यांवरुन बुलढाणा जिल्हा कॉंग्रेसने सरकारविरोधात निदर्शनं केली आहेत. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्रातील शिंदे सरकार तसेच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर विरोधकांनी टीका केली केले आहे. लोणार येथील बस स्टॅन्ड चौक समोर युवक काँग्रेसच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे.
यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना चक्क पकोडे विकून पंतप्रधान मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पामार्फत महाराष्ट्रातील असंख्य तरुणांना रोजगार मिळणार होता. मात्र आता तरुणांचा रोजगार हिरावल्याची भावना राज्यातील जनतेत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला कार्यक्रम हे. युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिकेत मापारी, यांच्या नेतृत्वात यावेळी लोणार-मेहकर युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष भरत राठोड, शेख जुनेद शेख करामत, ओम साहेबराव पाटोळे, सागर मापारी, अकिब कुरेशी, रुद्र पाटील, गणेश मापारी, सौरभ मापारी, पापू शेख, शारुक शेख,व सर्व युवक काँग्रेस चे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!