ताज्या घडामोडी

महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेश प्रतिनिधीपदी अब्दुल सत्तार इनामदार यांची निवड

येथील महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे जेष्ठ नेते तथा काँग्रेस अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार इनामदार यांची महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधीपदी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार एम़एम़शेख यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली आहे़ अब्दुल सत्तार इनामदार यांनी विविध पदावर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेवून त्यांची ही निवड करण्यात आली आहे़
परभणी शहरातील रहिवासी असलेले अब्दुल सत्तार इनामदार काँग्रेसचे जेष्ठ नेते असून त्यांनी आज पर्यंत काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष, काँग्रेस कमिटी जिल्हा सचिव, काँग्रेस अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष, काँग्रेस अल्पसंख्याक विभाग प्रदेश उपाध्यक्ष आदी विविध पदावर कार्य केले आहे़ या सर्व पदांवर उल्लेखनीय कामगिरी करीत त्यांनी काँग्रेसचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवले आहेत़ या विविध पदांच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब नागरीकांना अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे़ तसेच सातत्याने काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न केले आहेत़ या सर्व कार्याची दखल घेवून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार एम़एम़शेख यांनी केलेल्या शिफारशीनुसार प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी अब्दुल सत्तार इनामदार यांची महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेश प्रतिनिधीपदी निवड केली आहे़
महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधीपदी निवड झाल्याबद्दल अब्दुल सत्तार इनामदार यांचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेशराव वरपूडकर, माजी खा़अ‍ॅड़तुकाराम रेंगे पाटील, जेष्ठ नेते बाळासाहेब देशमुख, माजी उपमहापौर भगवान वाघमारे आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत़

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!