ताज्या घडामोडी

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून…* *येवला मतदारसंघातील १० साठवण बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी २ कोटी ४९ लक्ष निधी मंजूर*

*मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून…*

*येवला मतदारसंघातील १० साठवण बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी २ कोटी ४९ लक्ष निधी मंजूर*

*नाशिक,दि.२७ ऑक्टोबर :-* राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघातील १० साठवण बंधाऱ्यांच्या दुरस्तीसाठी २ कोटी ४९ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीच्या कामांमुळे येवला मतदारसंघातील सिंचन क्षेत्रात वाढ होऊन शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून येवला मतदारसंघात सिंचनाच्या अनेक योजनांची कामे सुरु असून मतदारसंघातील सिंचन क्षेत्रात अधिकाधीक वाढ करण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून येवला मतदारसंघातील येवला व निफाड तालुक्यातील एकूण १० बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी एकूण २ कोटी ४९ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच या कामांचा सुरुवात होऊन बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

या कामांमध्ये येवला तालुक्यातील हडप सावरगाव येथे पाझर तलाव दुरुस्ती करण्यासाठी ४३ लक्ष, मानोरी येथील सिमेंट कॉंक्रीट बंधारा दुरस्तीसाठी १८ लक्ष, विखरणी येथील पाझर तलाव दुरस्तीसाठी ३५ लक्ष, नेऊरगाव येथील पाझर तलाव दुरस्ती करण्यासाठी ३० लक्ष, कोळगाव २ येथील पाझर तलाव दुरुस्ती करण्यासाठी ४० लक्ष, एरंडगाव येथील सिमेंट बंधारा दुरस्तीसाठी १० लक्ष, बाभूळगाव येथील सिमेंट कॉंक्रीट बंधारा दुरस्ती करण्यासाठी १३ लक्ष, अंदरसुल येथील बंधारा दुरुस्ती करण्यासाठी १० लक्ष तर निफाड तालुक्यातील थेटाळे येथील आनंद सागर पाझर तलाव दुरस्ती करण्यासाठी ४० लक्ष, विंचूर ता.निफाड येथील सोनवणे वस्ती येथे सिमेंट कॉंक्रीट बंधारा दुरस्ती करण्यासाठी १० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!