ताज्या घडामोडी

एम.एस.जी.एस. मध्ये महामानव, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती उत्साहात साजरी.*

*एम.एस.जी.एस. मध्ये महामानव, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती उत्साहात साजरी.*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये दि.१४ एप्रिल रोजी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मकरंद सोनवणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मंगेश शिंदे, माधवराव गायकवाड, म्हसू घोडेराव, अतुल घोडेराव हे होते. कार्यक्रमाची सुरवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला तसेच शिक्षण व सहकार महर्षी गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.त्यानंतर ग्रामपालिका सदस्या सौ.वैशाली मंगेश शिंदे, मंगेश शिंदे, म्हसू घोडेराव व इतर मान्यवरांच्या हस्ते शाळेस भारतीय संविधानाची प्रत भेट म्हणून देण्यात आले.
सदर कार्यक्रमास इंग्लिश मिडीयमचे प्रिन्सिपल अल्ताफ खान, दीपक खैरनार, अमोल आहेर, गणेश सोनवणे, मनीष सैदाने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक खैरनार यांनी केले तर आभार अमोल आहेर यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!