ताज्या घडामोडी

शिरसोली वनक्षेत्रातील कंपाउंडचे अँगल चोरी करणाऱ्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक

शिरसोली वनक्षेत्रातील कंपाउंडचे अँगल चोरी करणाऱ्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरात दि. २-११-२०२२ शिरसोली नियक्षेत्रात मौजे रामदेवाडी येथे वनक्षेत्रातील कक्ष क्र. ४१५ मधील राखीव वनात मध्ये ८००० रुपये किमतीचे ५२ नग. कंपाउंड चे अँगल चोरी करणाऱ्या संशयित तीन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, शिरसोली नियक्षेत्रात मौजे रामदेववाडी येथे वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४१५ मध्ये राखीव वनात मध्ये ८००० रु किंमतीचे कंपाउंडचे लोखंडी अँगल चोरुन नेल्याची घटना गुरुवारी २ नोव्हेंबर घडली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भा.द.वी. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शन खाली म्सावद दुरक्षेत्र येथील पोना. प्रदीप पाटील, पोना. स्वप्निल पाटील, पो.कॉ हेमंत पाटील, यांनी गोपनीय माहिती काढून आरोपी
पांडुरंग फकीरा पाटील, रा. वाटिका आश्रम, जळगाव, पंकज शरद पवार, रा. द्वारका नगर जळगाव, मुकेश भास्कर गायकवाड रा. दादावाडी जळगाव, यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचे कडून गुन्हातील मुद्देमाल ८०००/ रुपये अँगल व गुन्हा आतील वापरलेली रिक्षा क्र. एम.एच १९ व्ही ५४४९ जप्त करण्यात आलेली आहे.
सदर आरोपींना दि. ९-१२-२०२२ रोजी पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नि. सो यांच्या आदेशाने पोना प्रदीप पाटील करीत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!