ताज्या घडामोडी

येवल्यात पेट्रोल डिझेल दरवाढीवर पर्याय म्हणून बायो सीएनजी व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन.

अंदरसुल प्रतिनिधी
हितेश दाभाडे

नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यात बल्हेगाव(नागडे) येथे
बायो गॅस व सेंद्रिय खत निर्मितीच्या प्रकल्पास हिरवा कंदील मिळाला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे,इंधन दरवाढीवर पर्याय म्हणून एम.सी.एल. कंपनी चा बायो CNG व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प तालुक्यात उभारण्यात येत आहे, बायो सीएनजी निर्मिती झाल्याने वाजवी दारात CNG इंधन उपलब्ध होणार आहे ,त्या मुळे येवल्यात गॅस इंधन वापरणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.म्हणून देशांअतर्गत अधिक CNG चे इंधन वाढवण्यासाठी कंपनीने पूर्ण भारतात १०० युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यातील एक युनिट येवल्यात उभारला जाणार आहे.म्हणून अंदरसुल गटाचे जिल्हापरिषद सदस्य महेंद्र काले,येवला नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या हस्ते ‘येवला फार्मर प्रोड्युसर कंपनी ली.’ बायोगॅस कंपनीच्या शाखेच येवला तालुक्यात बल्हेगाव (नागडे) येथे नुकतेच भूमिपूजन झाले असून २६ जानेवारी २०२२ रोजी येवला फार्मर प्रोड्युसर कंपनी ली.येवला. या कंपनी मार्फत बायो इंधनाची ,(C. N. G.गॅस )निर्मिती होणार आहे,या कंपनीत शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे हिरवे गवत उदा.गिंन्नी गवत,मकाचा बीटी काढल्या नंतर शिल्लख असलेला चारा,बाजरीचा चारा,शेतकऱ्यांनी सोडून दिलेला फेकण्याजोगा भाजीपाला, फेकण्याजोगे टमाटे,असे अनेक (वेस्टेज)हिरव्या पालेभाज्या हि कंपनी १००० रु टना प्रमाणे खरेदी करणार आहे,व कंपनी येवल्यात त्या सर्व रॉ मटेरियल वरती प्रोसेस करून बायो गॅस निर्मिती करणार आहे.गॅस तयार झाल्या नंतर ते इंधन म्हणून ( CNG ) सीएनजी गॅस वरती चालणाऱ्या सर्व टू व्हिलर,फोर व्हिलर गाड्याना वाजवी दारात इंधन दिले जाणार आहे,तसेच घरगुती गॅस वापरा साठी पेट्रोल-डिझलच्या अर्ध्या किंमत सर्वात कमी वाजवी दारात घरघुती गॅस उपलब्ध होणार आहे.तसेच गॅस तयार झाल्यानंतर शिल्लक मटेरिअल पासून शेती साठी सेंद्रिय खतांची आणि औषधांची निर्मिती केली जाणार आहे, त्या मुळे शेतकऱ्यांना खतांच्या दरवाढीचा प्रश्न सुटणार आहे,व सर्वांनाच (रेषड्यंस फ्री) विष मुक्त सेंद्रिय पालेभाज्याचे उत्पादन झाल्याने अनेकांच्या आरोग्याची चिंता मिटणार आहे.
हा प्रोजेक्ट सुरू करण्या साठी लागणारा कच्चा माल शेतकऱ्यां कडून खरेदि करण्यात येणार आहे, त्यात प्रामुख्याने .’सुपर नेपेईट सारखे गिंन्नी गवत’ खरेदी करण्यात येणार आहे,त्याचे वार्षीक उत्पन्न अंदाजे साधारन १५० ते २०० टन होते. त्या गवताला १००० रु टन दरा प्रमाणे १,५०,००० ते २,००,००० इतका, नफा होणार असून प्रत्येक सभासदांना सेंद्रिय खत मोफत मिळणार आहे.या प्रकल्पा मुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात हमखास वाढ होणार असून इंधन दरवाढीचा कायमस्वरूपी प्रश्न सुटणार असल्याचे कंपनीचे अध्यक्ष संपतराव लक्ष्मण जाधव व सचिव दादासाहेब गोरक्षनाथ जाधव यांनी दि ३ जून रोजी येवला,बल्हेगाव येथे झालेल्या ग्राम सदस्य बैठकीत सांगितले आहे..

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close