ताज्या घडामोडी

कळंब नाक्यावर पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाची अनोखी मोहीम # विनाकारण फिणाऱ्यांची कोरोना अँटिजेंन टेस्ट

कळंब नाक्यावर पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाची अनोखी मोहीम
# विनाकारण फिणाऱ्यांची कोरोना अँटिजेंन टेस्ट
नेरळ : दिपक बोराडे

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत, त्यासाठी महाराष्ट्रभर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत,तरीही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे या अनुषंगाने

,त्यावर अनोखा उपाय म्हणून कर्जत तालुक्यातील कळंब नाक्यावर ‘रत्नागिरी पॅटर्न’ राबवत कर्जत मुरबाड महामार्गावर पोलीस प्रशासन आणी आरोग्य विभागाने अनोखी मोहीम राबविली, या मार्गावर विनाकारण भटकणाऱ्या तसेच परजिल्हा वाहन चालक व प्रवाश्यांची कोरोना रॅपिड अँटिजेंन टेस्ट करण्यात आली.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन तसेच महाराष्ट्र शासनाने मागील वर्षभरात अनेक उपाययोजना राबविल्यात आहेत ,ठीक ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत ,तरीही काही महाभाग विनाकारण नियमांचे उल्लंघन करतांना दिसून येत आहेत,त्यावर उपाय म्हणून कर्जत तालुक्यात आरोग्य विभागाणी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने प्रथमच ‘रत्नागिरी पॅटर्न’ राबविण्यात येत आहे ,शुक्रवारी सकाळी 10 वाजल्या पासून कर्जत मुरबाड महामार्गावर कळंब पोलीस दुरक्षेत्र चेक नाक्यावर रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने

कोरोना रॅपिड अँटिजेंन टेस्ट मोहीम राबवण्यात आली त्यात विनाकारण फिरणाऱ्या तसेच प्रवाशी वाहन चालकांना ,विनंती करून समजावून प्रसंगी सक्तीने थांबवून त्यांची अँटिजेंन टेस्ट करून निगेटीव्ह असल्यास त्यांना सोडून देण्यात आले, या मोहिमे अंतर्गत सुमारे 42 लोकांची अँटिजेंन टेस्ट करण्यात आली,अश्याच प्रकारे मोहीम यशस्वीपणे सुरू ठेऊन कळंब नाक्यावरील बाजारपेठेतील सर्व दुकानदार ,विक्रेत्यांची कोरोना रॅपिड अँटिजेंन टेस्ट करण्यात येणार आहे ,
रायगड जिल्हा मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नेरळ पोलीस ठाण्याचे पीआय तानाजी नारनवरे यांच्या सहकार्याने कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ निलेश यादव ,डॉ योगेश पाटील,डॉ दिनेश जोशी आरोग्य कर्मचारी परीक्षित पेके, जितेंद्र खांडगे ,गणेश मानकामे,यांसह कळंब दुरक्षेत्त्राचे पोलीस उपनिरीक्षक केतन सांगळे ,निरंजन दवणे मनीष खुणे यांनी विशेष मेहनतीने या मोहिमेत सहभाग घेऊन यशस्वीपणे पार पाडली,

प्रतिक्रिया :-
रायगड जिल्हा मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने कर्जत तालुका आरोग्य अधिकारी सी के मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज कळंब पोस्ट चेक नाक्यावर वाहन चालकांची तसेच प्रवाश्यांची पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने रॅपिड अँटिजेंन टेस्ट मोहीम राबविण्यात आली त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून या मोहिमे अंतर्गत दुपारपर्यंत सुमारे 42 लोकांची अँटिजेंन टेस्ट करण्यात आली,
डॉ योगेश पाटील (आरोग्य अधिकारी कळंब प्राथमिक आरोग्य केंद्र )

प्रतिक्रिया :-
नेरळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तानाजी नररावणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी व वाहन चालक यांची आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने विशेष मोहिम राबिवली त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला असून वाहन धारकांना समजावून प्रसंगी सक्तीने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली या मोहिमेमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार आहे ,
निरंजन दवणे (पोलीस कर्मचारी कळंब चौकी )

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close