ताज्या घडामोडी

जत येथे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली

हेडिंग : जत येथे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली

अतुल शिंदे /9673614925
डफळापूर / प्रतिनिधी

जत येथिल पोलीस प्रशासन व नगरपरिषद यांच्याकडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली.शहरात अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांशी दुकाने सुरू.

याबाबत सविस्तर माहिती अशी की जत शहरासह तालुक्यात कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांची संख्या ही थोड्या प्रमाणात आटोक्यात येत असतानाच जिल्हा प्रशासनाने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सकाळी सात ते दुपारी अकरा वाजेपर्यंत किराणा दुकान, बेकरी, शेतीऊपयोगी साहीत्य, कृषी सेवा केंद्रे, चिकण,मटण,व मासे विक्री ची दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती.

जिल्हा प्रशासनाने हे आदेश देत असतानाच सामाजिक अंतर, व कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन या अटी घातल्या होत्या. परंतु जत शहरात आज शहरातील प्रमुख बाजारपेठेत व शहरातील वित्तीय संस्थांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली केली आहे.

जत शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्ण आढळून येत आहेत. त्यातच कोरोनाने मृत्यु होणारे रूग्ण ही वाढतच आहेत.असे असताना जत शहरातील ही गर्दी पाहून असे वाटायला लागले आहे की, जत शहरात कोरोना नाहीच अशा रितीने नागरिक वागत आहेत.

जत शहरासह तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती आता कुठे आटोक्यात येऊ लागली असताना जत पोलीस प्रशासन व जत नगरपरिषद याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे.

चौकाचौकात पोलीस बंदोबस्त असतानाही शहरातून मास्क न लावता टुव्हीलर व फोर व्हीलर वाहनातून बिनकामाचे फिरणारे व्यक्तीवर पोलीस प्रशासन कारवाई करताना दिसत नाही. त्याच प्रमाणे अत्यावश्यक सेवेत नसलेली व दुपारी अकरा वाजेपर्यंत वेळेची मर्यादा दिलेली दुकाने व अस्थापना या वेळेनंतरही सुरूच असल्याचे दिसून येत होते.या अस्थापना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करत असतानाही नगरपरिषद व पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसत होते.

अशीच परिस्थिती जत शहरात सुरू राहीली तर येणारे काळात जत शहर हे कोरोनाचे मोठे हाॅटस्पाॅट झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाचे आदेश न पाळणारे जत नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांच्यावर कारवाई करावी अशी अपेक्षा जत शहरवासियांकडून करण्यात येत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close