ताज्या घडामोडी

राजकीय आरक्षण राखण्यासाठी भाजपा ओबीसी मोर्चातर्फे वसई तहसील कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन

राजकीय आरक्षण राखण्यासाठी भाजपा ओबीसी मोर्चातर्फे वसई तहसील कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन

सुहास पांचाळ / पालघर

वसई दि.३ जून / भाजपा ओबीसी वसई विरार शहर जिल्ह्यातर्फे ओबीसींचे राजकीय आरक्षण राखण्यासाठी वसई तहसील कार्यालयासमोर जोरदार आक्रोश आंदोलन करण्यात आले.शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व भाजपा महाराष्ट्र प्रदेश मोर्चाचे सदस्य केदारनाथ म्हात्रे, कोकण विभाग संपर्क प्रमुख योगिता पाटील, मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नरेश पाटील, भाजपा प्रदेश भटक्या विमुक्त सेलचे सदस्य मारुती धुटुकडे, जिल्हा सेक्रेटरी उत्तम कुमार नायर, उपाध्यक्ष भुषण किणी, चिटणीस प्रविण गावडे, जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा प्रज्ञा पाटील आदींनी केले.
जिल्हाध्यक्ष नरेश पाटील यांनी सरकारच्या , .चुकीच्या ओबीसी धोरणाचे आपल्या प्रास्ताविक भाषणात वाभाडे काढले.भाजपाचे राष्ट्रीय नेते कै.गोपिनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करून केदारनाथ म्हात्रे यांनी आपल्या घणाघाती भाषणात महाराष्ट्र शासनाच्या ओबीसींच्या बाबतच्या निष्क्रिय भुमिकेवर खरपूस टीका केली. ठाकरे सरकारने ओबीसी विरोधात उदासीन भुमिका घेतल्यानेच सुप्रीम कोर्टाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले असे सांगून एकीकडे मराठा आरक्षणा बाबत चुकीचे धोरण व त्यामुळे सरकारवर संतापलेला मराठा समाज व आता दुसरीकडे ओबीसी समाजाचा ओढवून घेतलेला रोष यामुळे राज्यभर सरकार विरुद्ध वडवानल उठेल व त्यांत उध्दव सरकार उद्धस्थ होईल असे भाकीत त्यांनी यावेळी वर्तविले.वसई तालुक्यांतील आमदार व पालघर जिल्ह्यातील खासदारांनी आपली ओबीसींविषयी जनतेसमोर आपली भुमिका स्पष्ट करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.उत्तमकुमार नायर, रामानुजम यांनीही यावेळी आपली मते व्यक्त केली. ओबीसी जिल्हा चिटणीस निलेश राणे.गणेश किणी तसेच ओबीसी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आंदोलन यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली.तहसिलदारांना निवेदन देऊन आंदोलनाची सांगता झाली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close