ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज कोवीड सेंटर पारेचा आदर्श घेऊन इतर गावागावात हि कोवीड सेंटर सुरु करावेत – मा.यशराजे सांळूखे पाटील*

*छत्रपती शिवाजी महाराज कोवीड सेंटर पारेचा आदर्श घेऊन इतर गावागावात हि कोवीड सेंटर सुरु करावेत – मा.यशराजे सांळूखे पाटील*

सांगोला/विकास गंगणे-

अडीअडचणीच्या काळात माणसाने माणसाला मदत करणे हीच खरी माणूसकी आहे. आज सारे जग कोरोनाच्या संकटाने वेढलेले असताना, अनेकजण आपापल्या पद्धतीने मदत करताना दिसताहेत. काहीजण व्यक्तिगत स्तरावर, तर काहीजण समूह म्हणून या मदतकार्यात उतरले आहेत. पण अशी ही मदत सुटीसुटी न राहता, जेव्हा व्यवस्थेशी जोडली जाते तेव्हा तिचा परिणाम अधिक दुणावते. त्यासाठी प्रत्येक गावात कोवीड सेंटर ची आवश्यकता आहे ते आवश्यकता लक्षात घेऊन पारे गावचे माजी सरपंच व नुतन सदस्य संतोष पाटील व सहकाऱ्यांनी मिळून आज पारे गावात छत्रपती शिवाजी महाराज कोवीड सेंटर निर्मिती केली असून या परिसरातील इतर नेते मंडळी ग्रामस्थांनी एकत्र येऊन असा कोवीड सेंटर सुरु करावेत असे प्रतिपादन युवक नेते मा.यशराजे साळुंखे पाटील यांनी केले आहे .

सांगोला तालुक्यातील पारे गावात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना ने थैमान घातले आहे .गावातील अनेक रूग्णां कोरोना ने बळी गेले आहेत .अनेक रूग्णांना कोरोना वरील उपचारांसाठी वणवण भटकंती करावी लागली होती सर्व बाबी लक्षात घेऊन अखेर संतोष पाटील यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून कोवीड सेंटर सुरू केले आहे. आज सकाळी १० वाजता गावातील सुप्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य दिव्य पुतळ्यास युवक नेते यशराजे साळुंखे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर कोवीड सेंटरचे शुभारंभ करण्यात आले .यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक तालुका अध्यक्ष अनिल नाना खटकाळे ,जेष्ठ नेते तानाजी मोटे , माजी सरपंच किसनराव गायकवाड ,डिकसळ सरपंच चंद्रकांत करांडे , पारे गावचे सरपंच कांचनबाई चव्हाण ,उपसरपंच नामदेव साळुंखे ,
चाँदभैय्या शेख ,माजी तंटामुक्ती अध्यक्ष नानासाहेब गायकवाड ,धनाजी गायकवाड ,हिंद ए आझाद खलिफा ,
बाळासाहेब गायकवाड, सदाशिव गायकवाड, संभाजी भोसले , मुकेश चव्हाण ,ग्रामसेवक फासे ,सरकल इंगवले ,तलाठी कुंभार , पोलीस पाटील विजय गुजले , आरोग्य सेवक डॉ गायकवाड ,डॉ शिंदे ,डॉ वाघमोडे आशा वर्कर्स टेकाळे व गेजगे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते .
पारे गावातून कोरोनाला हद्दपार करण्याचा विडा आज आम्ही उचलला आहे .सर्वांच्या सहकार्याने लवकरात लवकर कोरोना हा पारे गावच्या बाहेर असेल .गेल्या वर्षी आमच्या गाव कोरोना मुक्त ठेवण्यासाठी आम्ही विविध उपाययोजना केल्या होत्या यावर्षी विविध माध्यमातून आम्ही पारेकर प्रयत्न केले आहेत. आणि येणाऱ्या काळात या कोवीड सेंटर च्या माध्यमातून कोरोना रूग्णांना सेवा करणार आहे.विशेषतः याठिकाणी सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोना रुग्णांच्या रक्ताच्या वेगवेगळ्या चाचण्यासाठी रुग्णांचा खर्चही वाचणार आहे.या सगळ्या सोयीसुविधामुळे तात्काळ निदान होण्यास मदत होणार आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण यामुळे वाढेल असा विश्वास आम्हाला वाटते. रूग्णांना मानसिक आधार देण्यासाठी योगाच्या प्रशिक्षित शिक्षकांची देखील या ठिकाणी टीम कार्यान्वित करण्यात आलेली आहे.हे सेंटर नैसर्गिक व मोकळ्या वातावरणात असल्याने रुग्ण लवकर बरा होऊन घरी जाण्यासाठी फायदा होणार आहे.असे प्रतिपादन माजी सरपंच संतोष पाटील यांनी केले आहे .

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close