ताज्या घडामोडी

चांदवड शहरातील नाले साफसफाई होणे गरजेचे चांदवड प्रतिनिधी-शांताराम घुले

चांदवड शहरातील नाले साफसफाई होणे गरजेचे

चांदवड प्रतिनिधी-शांताराम घुले

चांदवड शहरात सध्या अनेक समस्या निर्माण झालेल्या असून चांदवड नगरपरिषद अधिकारी मात्र याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. बस स्टँड शेजारून जाणारा नाला अतिशय अस्वच्छ असून झाडेझुडपे वाढेलली आहेत.गुजराथी नगर पुढील पुलाच्या शेजारून वाहणारा नाला सुद्धा अश्याच अवस्थेत आहे.नागरी वस्ती जवळच असल्याने नगरपरिषद ने नाले साफसफाई पावसाळा सुरू होण्याच्या आत करणे गरजेचे आहेत ही आशा नागरिक व्यक्त करीत आहेत.
मार्केट यार्ड शेजारील गुरुकुल कॉलनी व महालक्ष्मी नगर परिसरात शंकराचे मंदिर असून त्या जवळून वाहणारा नाल्याचा अतिशय घाणेरडा वास येत असल्याने व त्यामुळे डासांचे प्रमाण वाढल्याने नाल्याची स्वच्छता होणे गरजेचे आहे अशी अपेक्षा स्थानिक रहिवासी व्यक्त करीत आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close