ताज्या घडामोडी

चिंताजनक :- सावदा डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिक्षक भरती म्हणजे कोरोनाच्या प्रादुर्भावाला आमंत्रण…!*

आश्चर्य* शिक्षक भरतीच्या प्रसिद्ध जाहिरात मध्ये कोविड-१९ संदर्भात सूचनेचा उल्लेखच नाही

*चिंताजनक :- सावदा डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिक्षक भरती म्हणजे कोरोनाच्या प्रादुर्भावाला आमंत्रण…!*

*आश्चर्य* शिक्षक भरतीच्या प्रसिद्ध जाहिरात मध्ये कोविड-१९ संदर्भात सूचनेचा उल्लेखच नाही

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे मस्कावद रोड लागत अवैधरित्या उभारलेली एक भव्य दिव्य इमारत मध्ये नवीन डायमंड इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेज चालवली जाणार असून या शाळेचे संचालक मंडळांनी जवळपास विविध विषयांची २० शिक्षक पद भरण्याकरिता एका वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेल्या जाहिरात मध्ये कोविड-१९ व लॉक डाऊन संदर्भातील मुलाखत देण्यासाठी येणाऱ्या गरजूंनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अशा स्वरूपाची कोणतीही टिप- सूचनांचा उल्लेख नमूद केलेला दिसत नाही

या कोरोना महामारीच्या गंभीर काळात शासन व संपूर्ण यंत्रणा लोकांचे जीव वाचवण्याकरिता तारेवरची कसरत करत आहेत आणि वेळोवेळी कोरोना लॉक डाऊन संदर्भात नियम अटी गाईडलाईन सूचना जाहीर करीत असून त्याचे सर्व जनतेने काटेकोरपणे पालन करावे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई वेळ पडल्यास गुन्हे सुद्धा दाखल होतील असेही बजावत आहे याचा जाणीवपूर्वक विसर पडलेल्या सदरील शाळेच्या संचालकांनी या गंभीर काळात एका वृत्तपत्रात २० शिक्षक पद भरण्याकरिता प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत कोविड १९ चा वाढत्या प्रादुर्भावची कोणतीच दक्षता न घेता व लॉक डाऊन संदर्भात लागु नियम व अटींचे काटेकोरपणे पालन करून यावे अशी कोणतीही टीप सूचना मुलाखती देण्यास येणाऱ्या गरजु उमेदवारांकरीता प्रसिद्ध जाहिरात मध्ये केलेली दिसत नाही

या सुरू असलेल्या कोरोना महामारी च्या काळात एकाकडे शासन अत्यावश्यक सेवा सुद्धा ठेवणे साठी वेळेची मर्यादा दिलेली आहे आणि बाकी सर्व व्यापार धंदे दुकाने विविध व्यवसाय तसेच शाळा, कॉलेज,१० वी १२ वी च्या परीक्षा सह इत्यादी महत्वाच्या विशेष बाबींवर बंदी आणि संपूर्ण जिल्ह्यात धारा १४४,३७ (१) लागू केली असूनही दुसरीकडे सदर शाळेच्या संचालकांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शाळेत शिक्षक पद भरणे कामे एका वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध केल्याचा प्रकार लेला आहे

परिणामी सदर शाळेत प्रसिद्ध जाहिरात प्रमाणे ठरलेल्या दिनांक १२/६/२०२१ रोजी सरासरी एका पद करिता ५ पेक्षा जास्त गरजू येतीलच कारण की सदरील जाहिरात मध्ये नमूद पदव्यांचे शेकडो सुशिक्षित बेरोजगार आहेत म्हणून जवळपास त्यांची संख्या १०० च्यावर जाईल तसेच मुलाखती वेळी संचालक व शाळा स्टॉप ची सुद्धा उपस्थिती राहील व त्यांच्या या कृतीमुळे थेट कोरोनाच्या प्रादुर्भावाला आमंत्रण अशी स्थिती निर्माण होणार नाही का ? तसेच या माहामारीच्या काळात शिक्षक पद भरती कामी संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकारी कडून सदरील शाळा संचालकांना मुभा देण्यात आली आहेत का? या गंभीर प्रकाराकडे जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जळगांव , प्रांत अधिकारी फैजपूर, सावदा न.पा. मुख्याधिकारी व पोलीस प्रशासन हे लक्ष देतील का?

*विशेष* डायमंड शाळेच्या शिक्षक भरतीला शिक्षण विभागची परवानगीच नाही

*सदरील शिक्षक भरती बद्दल शिक्षणाधिकारी बी,जे पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रथम वेळी सांगितले की या भरतीला आमची परवानगी नाही या नंतर फोन करून बी,जे पाटील यांनी वर्ग बाबती विचारणा केल्यावर इ,१ ते १२ वी पर्यंत डायमंड इंग्लिश स्कूल असल्याची माहिती दिली असता हा विषय प्राथमिक शिक्षण अधिकारी कडचा आहे,असे बी, जे पाटील साहेब यांनी सांगितले* सदरील प्रकरण बाबत माध्यमिक शिक्षण अधिकारी श्री बी,जे पाटील यांची भूमिका संशयास्पद असून बरेच काही सांगून जात आहे, आणि या भरतीला त्यांचा छुपा पाठिंबा तर नाही ना असा यक्षप्रश्न समोर उभा झाला आहे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close