ताज्या घडामोडी

साळोख येथे कत्तलीसाठी आणलेल्या 41 गुरांची सुटका # बेकायदेशीर कत्तल खाना उध्वस्त # रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधेची कारवाई

४१ गोवंशीय व म्हैस वर्गीय लहान मोठे बछडे यांची वैद्यकीय तपासणी करून गोपाळ गोशाळा भिवंडी येथे सुरक्षित ठेवण्यात आले

साळोख येथे कत्तलीसाठी आणलेल्या 41 गुरांची सुटका

# बेकायदेशीर कत्तल खाना उध्वस्त
# रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधेची कारवाई
कर्जत : दिपक बोराडे

कर्जत तालुक्यातील साळोख तर्फे वरेडी येथे आज रायगड जिल्ह्या पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी कारवाई करून बेकायदेशीर कत्तलखाना उध्वस्त केला यावेळी कत्तली साठी आणलेल्या सुमारे 41 गुरांची सुटका करण्यात आली,
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील कळंब जवळील साळोख गावात गोवंशीय प्राण्यांची कत्तल केली जाते अशा स्वरूपाची गोपनिय माहीती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांना प्राप्त झाली होती . त्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात आली असता कर्जत तालुक्यातील साळोख गावात काही लोक बेकायदेशीर कत्तलखाना चालवत असल्याचे निष्पन्न झाले . कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातुन या माहितीत अतिशय गांभीर्य असल्याने पोलीस अधीक्षक रायगड यांनी तात्काळ दखल घेवुन दिघी सागरी पोलीस ठाणेचे सपोनि . गोविंद पाटील यांच्या अधिपत्याखाली पथक तयार करून मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने तात्काळ घटनास्थळी जावुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी आदेश दिले , आदेशानुसार सहायक पोलिस निरीक्षक गोविंद पाटील व त्यांच्या पथकाने तात्काळ नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील साळोख गावातील बुबेरे आळी या ठिकाणी जावुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे धाड टाकली असता , सदर ठिकाणी ३ जनावरांची कत्तल केलेली आढळुन आले . तसेच कत्तलीकरीता आणलेले गोवंशीय व म्हैस वर्गीय लहान मोठे बछडे असे एकुण ४१ जिवंत जनावरे मिळुन आली . घटनास्थळी हजर असलेले इम्तीयाज लतिफ सैरे वय -५१ वर्षे , समिर लतिफ सैरे वय -३२ वर्षे , शोएब शकिल बुबरे वय -२० वर्षे , तस्लिप अजिज अढाळ वय -४० वर्षे व शकिल मुस्ताक बुबेरे वय -४२ वर्षे , सर्व राहणार- साळोख , ता . कर्जत , जि.रायगड या ५ इसमांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे .
या कारवाईत जिवंत मिळुन आलेले ४१ गोवंशीय व म्हैस वर्गीय लहान मोठे बछडे यांची वैद्यकीय तपासणी करून गोपाळ गोशाळा भिवंडी येथे सुरक्षित ठेवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close