ताज्या घडामोडी

ममदापुर येथील आरोग्य केंद्रात- कोविड लसीकरण मोहीम…

ममदापुर येथील आरोग्य केंद्रात- कोविड लसीकरण मोहीम…

येथील उपप्राथमिक आरोग्य केंद्रात राजापूर येथील प्राथमिक आरोग्यकेंद्राअंतर्गत कोविशिल्ड लसीकरण मोहीम घेण्यात आली.कोविशिल्ड चे 70 डोस उपलब्ध करून देण्यात आलेले होते.यावेळी वय वर्ष 45-70 असलेल्या नागरिकांना कोविशिल्ड लसीकरण करण्यात आले.कोविशिल्ड लसीकरणाला प्रारंभ करतांना ममदापुरचे सरपंच सयाजी गुडघे,उपसरपंच सुमनबाई संजय म्हस्के, ग्रामसेवक भगवान गायके,राहुल वाघ,हरिश्चंद्र राऊत,देविदास गुडघे,सीताराम बैरागी,दिपक उगले,शिवाजी वनसे,तुळशीराम गुडघे,दिपक गुडघे,ज्ञानेश्वर काळे,सुकदेव वनसे, मीराबाई राऊत,कांता वनसे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.येवला शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही ग्रामीण भागातील रुग्ण संख्या कमी होतांना दिसत नाहीये.ग्रामीण भागातच कोरोनाचा प्रकोप वाढल्याचे दिसून येत आहे.त्यावर प्रशासनाकडून उपाययोजना राबविल्या जात आहे.राजापूर आरोग्य केंद्राने हाती घेतलेल्या मोहिमेत राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे मेडिकल ऑफिसर डॉ अक्षय सालपुरे,मेडिकल ऑफिसर डॉ काजल ठेंगिल,समुदाय आरोग्यअधिकारी डॉ योगिता गायकवाड,आरोग्यसेविका श्रीम.एम.पी. पैठणकर,आरोग्यसेवक ए. यू. महाले,आरोग्यसेवक एन.डी. तिरसे,व ममदापुर येथील आशा सेविका सुनीता बैरागी,शैला वाघ, वैशाली दळे आदींनी लसीकरण मोहिमेसाठी अर्थक परिश्रम घेतले.

कोट:-ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव लक्षात घेऊन. ममदापुर आरोग्यउपकेंद्रात कोविड-लसीकरण मोहीम घ्यावी अशी आम्ही वेळोवेळी आरोग्य विभागाकडे मागणी केली होती.गावात लस उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

सयाजी गुडघे पाटील रपंच ममदापूर

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close